Next
ठाणे येथे ‘जीएसटी’चे अद्ययावत सेवा केंद्र सुरू
प्रशांत सिनकर
Monday, November 05, 2018 | 05:03 PM
15 0 0
Share this story

ठाणे : वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी) व्यापारी, व्यावसायिक व सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून विविध ई-सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालयाने अद्ययावत सेवा केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते झाले.

या वेळी अप्पर राज्यकर आयुक्त सुमेरकुमार काळे, राज्य उत्पाद शुल्कचे उपायुक्त आशुतोष नाथ, राज्यकर सहआयुक्त विकास कुलकर्णी, राज्यकर उपायुक्त रूपमती मनेरे, श्रीमती महाबोले, सहायक राज्यकर आयुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘करदात्यांसाठी ‘जीएसटी’ अधिनियमानुसार ई-सेवा उपलब्ध केल्या आहेत. ई-सेवा नोंदणीसाठी अर्ज करणे, विवरणपत्र दाखल करणे, परताव्यासाठी अर्ज करणे अशा विविध सेवांचा यात समावेश आहेत. यात येणाऱ्या अडचणी या सेवा  केंद्राद्वारे सोडविण्यात येतील,’ असे अप्पर राज्यकार आयुक्त काळे यांनी सांगितले.  

या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी ‘जीएसटी’ हा महत्त्वाचा विभाग असून, या कार्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी भीमनवार यांनी आपण मूळ विक्रीकर विभागातील अधिकारी असून, हा परिवाराचाच कार्यक्रम असल्याचे नमूद करून या सेवा केंद्राच्या उभारणीबद्दल कौतुक केले.

राज्यकर सहआयुक्त कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link