Next
पुणे येथे ‘अमृतांजली फेस्टिव्हल’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this story

डॉ. शशिकला रवीपुणे : शास्त्रीय नृत्य व संगीताच्या ‘अमृतांजली फेस्टिव्हल २०१८’चे आयोजन १५ एप्रिलला करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवात अनेक नामवंत कलाकार कला-कौशल्य सादर करणार आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलायमामणी गुरू लक्ष्मी विश्वनाथन् आणि गायिका शुभश्री रामचंद्रन आपल्या सहकारीवृंदांसह खास चेन्नईहून येणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यातील ‘अमृतांजली स्कूल ऑफ भरतनाट्यम’च्या संस्थापक संचालक डॉ. शशिकला रवी याही प्रारंभीच्या वंदना सत्रात आपला अजोड नृत्याविष्कार सादर करणार आहेत.

या महोत्सवाची सुरुवात डॉ. शशिकला रवी यांनी २०१२मध्ये केली आणि तेव्हापासून तो दरवर्षी येथील अत्याधुनिक अमृतांजली स्टुडिओमध्ये आयोजित केला जात आहे. संस्कृती सीरीजतर्फे भरतनाट्यमवरील ‘पोएट्री ऑफ डान्स’ या शीर्षकाचा लघुपट, ज्यात गुरू लक्ष्मी विश्वनाथन यांच्या कामगिरीचा परिचय घडवला जाईल आणि त्यांच्या नृत्य प्रवासाबाबत संवादात्मक सत्रही होईल. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रौढांसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाणार असून, १२ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे.

डॉ. शशिकला मुंबईच्या संगीतकारांसह महाराजा स्वाती तिरुनल यांच्या रचना सादर करतील. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलाईमामणी लक्ष्मी विश्वनाथन चेन्नर्ईतील संगीतकारांच्या साथीने ‘अभिनय मंजरी’ हा नृत्याविष्कार सादर करतील.

यासंदर्भात बोलताना प्रख्यात भरतनाट्यम कलाकार डॉ. शशिकला म्हणाल्या, ‘अमृतांजली फेस्टिव्हल भारताची प्राचीन परंपरा व समृद्ध संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. शास्त्रीय नृत्य आणि संगीत या समर्पणाच्या सखोल बैठकी असून, त्या एखाद्याला उच्च आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातात. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे या कला अस्तंगत होणार नाहीत, याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.’

डॉ. शशिकला या पुण्यातील प्रख्यात भरतनाट्यम कलावंत, गुरू व नृत्य दिग्दर्शक आहेत. दिग्गज गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या डॉ. शशिकला आज आघाडीच्या भरतनाट्यम नर्तकांपैकी आहेत. त्या एकल, समूह नृत्य आणि पारंपरिक ते संकल्पनात्मक नृत्य दिग्दर्शनाचा आविष्कार घडवतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्या पुण्यातील ‘अमृतांजली स्कूल ऑफ भरतनाट्यम’च्या संस्थापक असून, तेथे अनेक शिष्यांना नृत्य प्रकाराचे सिद्धांत व प्रात्यक्षिक दृष्टीकोन यामध्ये पारंगत करत असतात. ‘अमृतांजली फेस्टिव्हल ऑफ क्लासिकल डान्स अँड म्युझिक’ आणि ‘अमृतांजली नृत्योत्सव’च्या त्या संस्थापक निमंत्रक व समन्वयक आहेत.

गुरू लक्ष्मी विश्वनाथन् यांच्याविषयी :
भरतनाट्यम कलावंत गुरू लक्ष्मी विश्वनाथन् यांना जिवंत आख्यायिका संबोधता येईल, एवढे त्यांचे योगदान आहे. त्या तंजावूर परंपरेच्या मूलतत्त्वाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना ‘काव्यात्मक नर्तकी’ (पोएटिक डान्सर) आणि ‘नर्तकींची नर्तकी’ (डान्सर्स डान्सर) असे म्हटले जाते. त्या आपल्या नृत्याला तीव्रतेने दृश्य काव्य बनवतात.

लक्ष्मी विश्वनाथन् यांना अनेक पुरस्कार व बहुमानांनी गौरवण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, म्युझिक ॲकॅडमी, मद्रासचा प्रतिष्ठेचा नृत्य कलानिधी पुरस्कार आणि कालिदास सम्मान यांचा समावेश आहे. त्या सध्या कलाक्षेत्र मासिकाच्या संपादक आहेत. यंदाच्या महोत्सवात त्या ‘अभिनय मंजरी’ हा आविष्कार सादर करणार आहेत.

शुभश्री रामचंद्रन यांच्याविषयी :

गायिका शुभश्री रामचंद्रन या पद्मभूषण संगीत कलानिधी त्रिचूर रामचंद्रन व कलानिधी चारुमती रामचंद्रन यांच्या कन्या असून, अधिकारी एकल गायक (सोलो व्होकलिस्ट) म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या सध्याच्या काळात संगीतातील जीएनबी-एमएलव्ही परंपरेची मशाल पुढे नेणाऱ्या सर्वाधिक प्रभावी नेत्या आहेत. त्यांना दिग्गज गुरू डी. के. पट्टमल यांच्याकडून संगीत शिकण्याचे भाग्य लाभले आहे. शुभश्री यांना अनेक पुरस्कार व बहुमानांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात युवा कला भारती, भारतीय विद्या भवन यंग म्युझिशियन ॲवॉर्ड २०१४, कृष्ण गण सभेतर्फे २०१५ चा यज्ञरामन एक्सलन्स ॲवॉर्ड आदींचा समावेश आहे.

महोत्सवाविषयी :
दिवस : रविवार, १५ एप्रिल २०१८,
वेळ : सायंकाळी पाच ते आठ
स्थळ : अमृतांजली स्टुडिओ, ४०७-४०९, लुंकड स्कायमॅक्स, दत्त मंदिरासमोर, विमान नगर, पुणे ४११ ००६
अधिक माहितीसाठी संपर्क : शशिकला रवी- ९९६०६ २७९९८
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link