Next
‘एसओटीसी ट्रॅव्हल’च्या महसुलात वाढ
प्रेस रिलीज
Wednesday, June 20, 2018 | 04:55 PM
15 0 0
Share this story

मुंबई : डिजिटायझेशन आणि ग्राहकांच्या बदलत्या खरेदीशैलीमुळे किरकोळ व्यवसायात आमूलाग्र बदल झाला आहे. प्रत्यक्ष दुकान आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा एकत्रित असा व्यापक अनुभव मिळत असल्याने या व्यावसायिकांना बाजारात अग्रेसर राहता येते. ‘एसओटीसी’ने गेल्या वर्षी ई-कॉमर्स सेवांद्वारे डिजिटल व्यवसायाचा शुभारंभ केला. ‘एसओटीसी’ने अत्यंत सुलभ अॅक्सेस असलेली, सोयीची वेबसाइट सुरू केली. नवी बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत पोहोचून विकास साध्य करण्याचा तो एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.

पर्यटनविषयक माहिती घेण्याच्या दृष्टीने अतिशय सुलभ अॅक्सेस, मिळणारी विस्तृत माहिती आणि त्याअनुषंगाने तिचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा मानस अशा विविध घटकांमुळे ग्राहक याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. गेल्यावर्षीपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्यामुळे नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्गच उपलब्ध झाला आहे. परिणामी ऑनलाइन सुविधेमुळे सध्याच्या व्यवसायात १० ते १२ टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

बॅक-एंड तंत्रज्ञानाच्या साह्याने ‘एसओसीटी’च्या प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘एसओटीसी’ने ऑनलाइन सुविधा सुरू केली; तसेच त्याची सक्षमता वाढविण्यात आल्याने ‘एसओसीटी’ला ग्राहकांशी कायम जोडून राहता आले.

व्हिसा ऑन ट्रॅव्हल, कमी अंतरावरील पर्यटनस्थळे आणि लाँग विकेंड प्रवासाकडे वाढत असलेला कल लक्षात घेऊन ‘एसओटीसी’ने ‘ईझी सिरीज’अंतर्गत ऑनलाइन पूर्वनियोजित कस्टमाइझ पॅकेजेस उपलब्ध केली. ग्रुप टुर्ससाठी किफायतशीर एफआयटी पॅकेजेसचा यात समावेश आहे. ‘ईझी’ उत्पादन श्रेणीअंतर्गत १२५ पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात थायलंड, सिंगापूर, मॉरिशस, दुबई, हाँगकाँग, बाली, स्पेन, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, केरळ, अंदमान, भूतान, काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.

एसओटीसी ट्रॅव्हलच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये तरुण नोकरदार, उद्योजकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. तरुणांच्या सिंगापूर, थायलंड, दुबई आणि मॉरिशस पर्यटनासाठी एफआयटी पॅकेजेस् आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आध्यात्मिक अनुभवाच्या दृष्टीने एसोटीसी ऑनलाइनने ‘दर्शन’अंतर्गत विविध धार्मिक पर्यटनांची पॅकेजेस उपलब्ध केली असून, युरोप तसेच अमेरिका पर्यटनासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पॅकेजेस् देखील आहेत.

नेहमीच्या चौकशींव्यतिरिक्त देशांतर्गत आणि कमी अंतराच्या पर्यटनासंदर्भात ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या चौकशीमध्ये १८ टक्क्यांची वाढ झाल्याचे ‘एसओटीसी’च्या निदर्शनास आले आहे. या ऑनलाइन सुविधेमुळे देशांतर्गत ग्रुप टुर्स, कमी अंतरावरील आंतरराष्ट्रीय जीआयटी, तसेच युरोप आणि अमेरिकेसाठी १.२५ लाख ते तीन लाख रुपयांत बुकिंग करण्याची सुविधा असलेल्या बजेट श्रेणीतील पॅकजेसना हे ग्राहक पसंती देत आहेत. २०१७मध्ये ‘एसओसीटी’च्या ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून अशी सात हजार बुकिंग प्राप्त झाली.

ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून सिंगापूर, दुबईला सर्वाधिक पंसती दिली जाते. त्याखालोखाल इजिप्त, युरोप आणि बालीला जाण्याकडे पर्यटकांचा कल आहे. मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, चंदिगढ, लखनौ आणि जयपूर या प्रमुख शहरांमधून ऑनलाइन सुविधेद्वारे सर्वाधिक बुकिंग होते.

एसओटीसी ट्रॅव्हलच्या सेल्स, इंडिया अॅंड एनआरआय मार्केट्स, तसेच ई-कॉमर्सचे प्रमुख डॅनिअल डिसोझा वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाबद्दल माहिती देताना म्हणाले की, ‘भारतीय पर्यटकांची संख्या वाढत असून, त्यांना पसंत पडतील अशी स्थळे पाहण्याचा आणि सुखद प्रवासाचा अनुभव देणाऱ्या पर्यटनाकडे त्यांचा जास्त कल आहे. नव्या पर्यटनस्थळांचा शोध आणि तिथे पर्यटन करणे ही सर्व संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. आम्ही ओम्नी सुविधा उपलब्ध केल्याने एसओटीसी ट्रॅव्हल सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी हजर असून, त्यांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करीत आहे.’

‘गेल्या एक वर्षात वेबसाइटला भेट देणाऱ्या, त्यावरील माहिती जाणून घेणाऱ्या, तसेच आमच्या ऑफर्सचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ऑनलाइन असो वा ऑफलाइन आमच्या ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार प्रक्रियेत सुधारणा करून त्यांना पर्यटनाचा पूर्ण आनंद देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे डिसोझा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link