Next
‘बाविसाव्या शतकासाठी सज्ज व्हा ’
प्रेस रिलीज
Saturday, March 10, 2018 | 04:29 PM
15 0 0
Share this story

ज्ञान प्रबोधिनीतील ‘वाचस्पती अरुण निगवेकर’ संगणक कक्षाचे उदघाटनप्रसंगी डॉ . अरुण निगवेकर ,प्राचार्य मिलिंद नाईक ,कार्यवाह सुभाष देशपांडे ,विवेक पोंक्षे आणि निगवेकर कुटुंबीय
पुणे : ‘तंत्रज्ञान मोठ्या वेगाने बदलत असून एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना बाविसाव्या शतकासाठी सज्ज करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आली आहे,ज्ञान प्रबोधिनीसारख्या संस्थांनी ही जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना पुढील मार्ग दाखवावा’, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी केले. 

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेला अद्ययावत संगणक कक्ष उभारण्यासाठी डॉ अरुण निगवेकर यांनी चार लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या या संगणक कक्षाचे उदघाटन शनिवारी झाले . यावेळी हेमा निगवेकर,ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे, शैक्षणिक विभागाचे कार्यवाह विवेक पोंक्षे, प्राचार्य मिलिंद नाईक तसेच निगवेकर कुटुंबीय उपस्थित होते.

प्रशालेच्या वार्षिक वैज्ञानिक प्रकल्प स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ निगवेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

या वेळी बोलताना डॉ. निगवेकर म्हणाले, ‘शिक्षण ही सोन्यासारखी संधी आहे. विद्यार्थ्यांनी ती योग्य तऱ्हेने वापरली पाहिजे. शिक्षणातील संधींचा वापर करून नवे काही करता येईल का,याचा विचार केला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी ही शिक्षण क्षेत्रात वेगळी प्रशाला म्हणून भारतात आणि भारताबाहेर ओळखली जाते. सामाजिक बांधीलकी असलेली संस्था, झोकून देण्याची वृत्ती असलेल्यांची संस्था असा लौकिक आहे. म्हणून ज्ञान प्रबोधिनीने पुढील मार्ग दाखवावा आणि विद्यार्थ्यांनी देखील शाळेला पुढे नेण्याची संधी घ्यावी.’ 

‘तंत्रज्ञान मोठ्या वेगाने बदलत असून एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना बाविसाव्या शतकासाठी सज्ज करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आली आहे,ज्ञान प्रबोधिनीसारख्या संस्थांनी ही जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना पुढील मार्ग दाखवावा’,असेही ते म्हणाले. पुढील संगणक प्रकल्पासाठी आणखी १४ लाख रुपये देणगी देण्याची घोषणा या वेळी डॉ. अरुण निगवेकर यांनी केली. या वेळी शंतनू निगवेकर, डॉ. श्रद्धा निगवेकर,केदार निगवेकर ,पल्लवी निगवेकर, विद्याधर गाडगीळ, वैशाली गाडगीळ उपस्थित होते.  

प्राचार्य डॉ.  मिलिंद नाईक यांनी प्रास्ताविक  तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल अक्कलकोटकर यांनी केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Naik About
Prabodhini is ahead of time. It is ever progressive. Best wishes
0
0

Select Language
Share Link