Next
डीएनएस बँकेतर्फे मिरजोळे येथे आरोग्य शिबिर
BOI
Wednesday, January 23, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this story

आरोग्य शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती विभांजली पाटील.

रत्नागिरी : डोंबिवली नागरी सहकारी बँक (डीएनएस), त्र्यंबकेश्‍वर येथील सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट, रामनाथ हॉस्पिटल आणि मिरजोळे ग्रामपंचायत यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती विभांजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पंचायत समिती सदस्य भैय्या भोंगले, सरपंच गजानन गुरव, उपसरपंच गणेश पाडावे, बँकेचे शाखाधिकारी प्रकाश खाडिलकर, डॉ. सुनील नाईक, डॉ. शुभांगी गौडकर, डॉ. मंदार शहाणे, डॉ. मृण्मयी शहाणे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मयेकर, चारुदत्त सुर्वे, गंधाली मयेकर, रेश्मा पाटील, शुभांगी पंड्ये, आस्था मालगुंडकर, पूजा जाधव, माजी तंटामुक्त अध्यक्ष संजय पंड्ये आदी उपस्थित होते.



या शिबिराचा लाभ मिरजोळे व आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी घेतला. हृदयविकार, पोटांचे विकार, महिलांचे विकार, सांधेदुखी, मधुमेह आदींच्या अनेक रुग्ण यात सहभागी झाले. या वेळी आरोग्य विम्यासंदर्भात माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते.

प्रकाश खाडिलकर यांनी बँकेच्या योजना सांगून आजच्या धकाधकीच्या युगात आरोग्य तपासणी, आरोग्य विमा किती गरजेचा आहे, हे विविध उदाहरणे देऊन सांगितले. डॉ. नाईक यांनी गुरुपीठाची माहिती दिली. नाडी व बीएमआय चाचणी मोफत दिली जाते. रत्नागिरीतील हे ११वे शिबिर असून, भारतासह नेपाळमध्येही शिबिरे सुरू आहेत. विविध आजार, औषधांची माहिती त्यांनी दिली.

डॉ. गौडकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डीएनस बँक व मिरजोळे ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link