Next
विधानसभा मतदानाला पंजाब आणि गोव्यात प्रारंभ!
BOI
Saturday, February 04, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. पंजाबमधील ११७ तर गोव्यातील ४० जागांसाठी हे मतदान होत आहे. काही वेळापूर्वीच दोन्ही राज्यांमध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या मोदी सरकारच्यादृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गोव्यात सत्ताधारी भाजपसमोर राजकीय पटलावर नव्याने आलेला आप व मगोप-गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांच्या आघाडीचे आव्हान आहे. राज्यात अकरा लाखांवर मतदार असून, १६४२ मतदान केंद्रे आहेत. या मतदानातून पाच माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य निश्चित होईल. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस यांच्यात राज्यात सत्तेसाठी चुरस आहे. त्यातच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा राज्यात परतणार काय याभोवतीच प्रचार केंद्रित झाला होता. गेल्या वेळी भाजपची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी आघाडी होती. या वेळी भाजप स्वबळावर ३७  ठिकाणी काँग्रेस ३८ तर आप ३९ जागा लढवीत आहे.
तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) सहभागाने विलक्षण उत्कंठा निर्माण केलेल्या पंजाबमध्ये  ११७ जागांसाठी मतदान होत आहे. अकाली दल- भाजपकडून सत्ता हुसकावून घेण्यामध्ये ‘आप’ की काँग्रेस बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असेल. बदलांचे वारे घुमत असताना दलितांची मते ‘आप’कडे वळत असल्याचा अंदाज आहे. पंजाबात दलितांची तब्बल ३४ टक्के मते आहेत आणि देशातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. तसेच डेरा सच्चा सौदाने अकाली- भाजपला उघड पाठिंबा दिलाय.  पंजाब आणि गोव्यातील मतमोजणी उर्वरित तीन राज्यांप्रमाणे ११ मार्च रोजी आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search