Next
मतदार जागृती करणारे शाहरुखचे रॅप साँग
स्वतः गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित; पंतप्रधान मोदींनीही केली स्तुती
BOI
Wednesday, April 24, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : देशभरात सगळीकडेच लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना चित्रपटसृष्टीतले तारे-तारकाही या लोकशाही उत्सवात स्वतःचे योगदान देताना दिसत आहेत. मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत असताना अभिनेता शाहरुख खानने मतदारांसाठी एक रॅप साँग गायले आहे. मतदान जरूर करा या आशयाचे हे गाणे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या गाण्याची स्तुती केली आहे. 

तनिष्क बागची आणि अब्बी व्हायरल या दोघांनी हे गाणे लिहिलेले असून शाहरुखने स्वतः ते गायले आहे. एक मिनिटांच्या या गाण्यात मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ‘इट्स टाईम टू वोट.. करो मतदान’ अशा ओळी असणारे हे गाणे आहे. ‘मतदान हा आपला केवळ हक्कच नाही, तर ती आपली शक्ती आहे. या शक्तीचा वापर केला पाहिजे’, अशा आशयाच्या ओळी व्हिडिओसाठी देण्यात आल्या आहेत. 

मतदानासाठी मतदारांमध्ये जागृती करण्याचे आवाहन मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाकारांना केले होते. त्यानुसार अभिनेता रणविर सिंग, आर. माधवन, वरुण धवन यांनी आपापल्या पद्धतीने हे काम करण्याचा प्रयत्न केला. देशाप्रती असलेल्या या समाजभावनेचा आदर ठेवून शाहरुख खानने आपल्या अनोख्या अंदाजात या गाण्याची निर्मिती केली. नुकतेच शाहरुखने या गाण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला असून, हे आपण आधीच करायला हवे होते, यासाठी थोडा उशीर झाला, अशी खंत व्यक्त करणारा मेसेजही त्याने त्यासोबत लिहिला आहे.  

दरम्यान पंतप्रधान मोदींनी या गाण्याची स्तुती करत शाहरुखचे कौतुक केले आहे. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे नागरिक या गाण्याने प्रभावित होऊन या गाण्याला जरूर प्रतिसाद देतील आणि नक्की मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search