Next
प्रा. नलावडे यांच्याशी ‘विज्ञानगप्पा’
प्रेस रिलीज
Wednesday, February 07 | 01:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञानगप्पां’च्या मालिकेत प्रा. संजीव नलावडे संवाद साधणार आहेत. ‘पश्चिम घाट : एक आगळा वेगळा जीववैज्ञानिक प्रदेश’ याविषयी प्रा. नलावडे बोलणार आहेत.

प्रा. नलावडे फर्ग्युसन महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत. पर्यावरणाच्या सध्या सुरू असणाऱ्या परवडीमुळे सजीवांच्या अनेक जाती आणि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा विनाश कसा थांबवायचा हा गहन प्रश्न जगासमोर आहे. अशावेळी अजूनही जिथे पर्यावरणीय संस्था नैसर्गिक अवस्थेत तग धरून आहेत, अशा पश्चिम घाटासारख्या ठिकाणी वैज्ञानिकांना आशेचे किरण दिसतात.

प्रा. संजीव नलावडेपश्चिम घाटाचा विस्तार किती आहे, तो जीववैज्ञानिक प्रदेश कसा ठरतो, जीववैज्ञानिक प्रदेश म्हणजे काय, आणि त्या संदर्भात पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये कोणती याचा उहापोह प्रा. नलावडे करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ‘अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे,’ असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शुक्रवार, नऊ फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : दृक्श्राव्य सभागृह, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link