Next
ठाण्यात भर पावसात दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ३९ हजार ९१२ गणेशमूर्तींचे विसर्जन
BOI
Wednesday, September 04, 2019 | 02:06 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
मंगळवारी (तीन सप्टेंबर) ठाण्यात भर पावसात दीड दिवसाच्या गणपतीबाप्पांना निरोप देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाण्यातील सगळ्या विसर्जन घाटावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ३९ हजार ९१२ गणपतींना मंगळवारी निरोप देण्यात आला.

ठाण्यातील कोपरी खाडी विसर्जन घाट, रेतीबंदर विसर्जन घाट, तलाव पाळी, मखमली तलाव, रायला देवी तलाव, गायमुख विसर्जन घाट आदी परिसरात ठाणे महानगरपालिका, वाहतूक विभाग, पोलीस यांच्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनाच्या वेळी पावसाचा जोर असतानाही वाजतगाजत मिरवणूक काढून गणपतींचे विसर्जन करण्यात आले. भक्तांकडून विसर्जन करताना शिस्तीचे दर्शन घडले. सर्व विसर्जन घाटांवर प्रखर दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. 

पोलिसांकडून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून घाटावर आलेल्या गणेशभक्तांना आणि नागरिकांना शिस्तीत विसर्जन करण्याचे आवाहन लाउडस्पीकरवरून केले जात होते. पालिकेकडून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून परिसरात स्वच्छता राखली जात होती. निर्माल्य कलशात निर्माल्य टाकण्याची विनंती केली जात होती. वाहतूक पोलिसांनी विसर्जन घाटाचा परिसर दुपारपासूनच वाहनमुक्त केला होता. 

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसर एक लाख ४७ हजार ३६९ गणपती बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये दीड दिवसांचे ३९ हजार ९१२, तीन दिवसांचे १५६०, पाच दिवसांचे २८ हजार ७२४, सहा दिवसांचे १५ हजार ६५६, सात दिवसांचे २० हजार २८५, दहा दिवसांचे ६६०३ आणि ११ दिवसांचे ३३ हजार ६५२ घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search