Next
‘पिंक’च्या रिमेकद्वारे विद्या बालनचे तमीळ चित्रसृष्टीत पदार्पण
निर्माता बोनी कपूरही यानिमित्ताने ठेवणार दक्षिणेत पाऊल
BOI
Wednesday, January 30, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा ‘पिंक’ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला तो वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण विषयामुळे. निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाचा तमीळमध्ये रिमेक करायचे ठरवले असून, अभिनेत्री विद्या बालन या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून विद्या तमीळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.  

निर्माते बोनी कपूर यांनी ‘पिंक’च्या या रिमेकद्वारे दक्षिणेत पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. दिग्दर्शक एच. विनोथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत अजित कुमार दिसणार आहेत. ‘इंग्लिश-विंग्लिश’चे काम सुरू असताना अभिनेत्री श्रीदेवीची अशी इच्छा होती, की अजित कुमार यांनी बोनी कपूर यांच्या बॅनरचा एखादा चित्रपट तमीळमध्ये करावा. श्रीदेवीच्या या इच्छेनुसार आपण हा चित्रपट अजित कुमार यांना घेऊन करत असल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले. 

बोनी कपूर यांनी आजवर बॉलिवूडमध्ये केलेले ‘सात दिन’, ‘लोफर’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’ यांसारखे चित्रपट हे दक्षिणेतील चित्रपटांचे रिमेक म्हणून किंवा त्यांच्या कथांवर आधारित असे केले होते. आता पहिल्यांदाच एखाद्या हिंदी चित्रपटाचा रिमेक ते तमीळमध्ये करत आहेत. 

दरम्यान, हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून विद्या बालनला तमीळ कलाकारांसोबत काम करताना पाहणे ही खूप आनंदाची बाब असल्याचे आणि तिची ही भूमिका खूप महत्त्वपूर्ण असल्याचे दिग्दर्शक विनोद यांनी म्हटले आहे. विद्या बालन आणि अजित कुमार यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात रंगराज पांडे, श्रद्धा श्रीनाथ यांच्या प्रमुख भूमिका असतील. याशिवाय आदिक रविचंद्रन, अर्जुन चिदंबरम, अभिरामी वेंकटचलम, एंड्रिया टारियांग हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वर्षी एक मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link