Next
प्रजासत्ताक दिनी पॅराप्लेजिक रिहॅबिलेटेशन सेंटरमधील ९१ जवानांचा सत्कार
BOI
Friday, January 25, 2019 | 12:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या अनेक शूर जवानांना अनेकदा कायमचे अपंगत्व येते. प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा शूर जवानांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलेटेशन सेंटरमधील ९१ जवानांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

आबा बागुल
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर निर्धाराच्या बळावर देशासाठी पुन्हा लढण्याचे स्वप्न बाळगणारे, ज्वाज्जल्य देशाभिमान जागवणाऱ्या या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी उपमहापौर आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रजासत्ताक दिनी शनिवारी, २६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तिरंगी फेटे, मफलर, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या जवानांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाविषयी :
वीर जवानांचा सत्कार 
स्थळ : खडकी पॅराप्लेजिक रिहॅबिलेटेशन सेंटर.
वेळ : शनिवार, २६ जानेवारी, सकाळी नऊ वाजता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link