Next
ई-वेस्ट निवारण कृती अभियानाचा कार्यक्रम जाहीर
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना मान्यवर.

पुणे : ‘प्लास्टिक, ई-वेस्ट निवारण कृती अभियानाचा कृती कार्यक्रम आज (११ मार्च) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. प्लास्टिक उत्पादक, वापरकर्ता, सामाजिक संस्था, उद्योगांच्या सीएसआर योजना आणि सरकारी प्रयत्नांचे सुसूत्रीकरण करणार असल्याची आणि दूरगामी कामातून  प्लास्टिक कचरा समस्येवर उपयोगी ठरणारे नवे प्रारूप (मॉडेल) उभारणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांच्या या मंचातर्फे कचरा, प्लास्टिक समस्येवर कृती कार्यक्रम जाहीर करण्यासाठी  पुणे श्रमिक पत्रकार संघात सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘माय अर्थ’चे अनंत घरत, कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ ललित राठी, एन्व्हायरॉन्मेंटल क्लब ऑफ इंडिया नीलेश इनामदार, भरारी प्रतिष्ठानच्या संध्या बोमण्णा, रिटेल व्यापारी असोसिएशनचे सचिन निवंगुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अधिकारी दत्तात्रय देवळे अशा अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्लास्टिक संकलन ते प्रक्रिया, उत्पादक संकलक ते उपभोक्ता अशा प्लास्टिक कचराविषयक साखळीमध्ये सूत्रबद्ध काम करण्याचे नियोजन या मंचाने केले आहे. या सर्व कृती कार्यक्रमात प्रशिक्षण, जनजागृतीवरदेखील भर देण्यात येणार असून, महिला बचत गट, मंडळे, सामाजिक संस्था, सोसायट्यांना बरोबर घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षण, जनजागृतीसाठी विविध माध्यमे, साधनांची निर्मिती या मंचाद्वारे केली जाणार आहे. पहिला प्रशिक्षण कार्यक्रम १६ मार्च २०१९ रोजी दत्तवाडीतील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे होणार आहे. एक मे या कामगार दिनी कचरावेचक, स्वच्छतासेवकांचा सन्मान करण्यासाठी ‘पर्यावरण रक्षक दिन’ साजरा केला जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

टाकाऊ प्लास्टिकला हमीभाव देण्याचा भारतातील पहिला  प्रयत्न या मंचाद्वारे केला जाणार असल्याची घोषणाही या या वेळी करण्यात आली. हमीभाव मिळाल्यास प्लास्टिक वर्गीकरण आणि संकलन करणाऱ्या स्वच्छता सेवकांना प्रोत्साहन मिळणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link