Next
‘बजाज अलियांझ’तर्फे डिजिटल ‘लाइफ सर्टिफिकेट’ सादर
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ग्राहकांना डिजिटल सुविधा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या तंत्रज्ञान-आधारित विविध उपक्रमांच्या अनुषंगाने, बजाज अलियांझ लाइफ या पुण्यातील आघाडीच्या खासगी लाइफ इन्शुरन्स कंपनीने ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ सादर केले आहे. या क्षेत्रातील ही पहिलीच सेवा असून, त्यामुळे निवृत्तीधारकांना बजाज अलियांझ लाइफच्या शाखेत न जाता त्यांचे सर्टिफिकेट ऑफ एक्झिस्टन्स (सीओई) किंवा लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन सादर करता येणार असल्याने योजनाधारकांसाठी अॅन्युइटी पेन्शनचा दावा करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. 

हे सर्टिफिकेट सादर करण्यासाठी वार्षिक पद्धतीने कंपनीच्या शाखेत जाण्याचे शारीरिक कष्ट वाचवण्यासाठी योजनाधारकांना डिजिटल सुविधा देणे, या सेवेचे उद्दिष्ट आहे. अॅन्युइटी पॉलिसीद्वारे निवृत्तीवेतनासाठी पात्र असणाऱ्या योजनाधारकांनी ‘सीओई’ किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक असते. दर वर्षी सादर केले जाणारे हे सर्टिफिकेट योजनाधारक हयात असल्याचा पुरावा मानले जाते. त्यामुळे योजनाधारक निवृत्तीवेतन किंवा अॅन्युइटी रकमेसाठी पात्र ठरतो.

या विषयी बोलताना बजाज अलियांझ लाइफचे ऑपरेशन्स व कस्टमर एक्स्पिरिअन्स चीफ कायझाद हिरामाणेक म्हणाले, ‘आमच्या सर्व ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी, या उद्देशाने आमच्या व्यवसायातील सर्व श्रेणींमध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहोत. याच हेतूने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ही सेवा सुरू करण्यात आली. योजनाधारकांना त्यांच्या अॅन्युइटीचा दावा करण्याची प्रक्रिया सुरळित, पेपरलेस करता यावी, हाही उद्देश होता. बंधनकारक असणाऱ्या अशा सोप्या प्रक्रियेसाठी येणारा ताण कमी व्हावा आणि ही प्रक्रिया ग्राहकांचे अनेक तास न घेता केवळ काही सेकंदांमध्ये पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही ही सेवा सुरू केली आहे. ही प्रक्रिया ग्राहकांना त्यांच्या घरून, त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार करता यावी, यासाठी आम्ही त्यांना सक्षम करत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search