Next
‘आयडीबीआय’ची ‘न्यू इंडिया अॅश्युरन्स’सोबत भागीदारी
प्रेस रिलीज
Tuesday, July 23, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this article:

भागीदारीप्रसंगी उपस्थित आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा (डावीकडून दुसरे), दी न्यू इंडिया अॅश्युरन्सचे सीएमडी अतुल सहाय (उजवीकडून पहिले) यांच्यासह आयडीबीआय बँकेचे व न्यू इंडिया अश्युरन्सचे वरिष्ठ अधिकारी.मुंबई : आयडीबीआय बँक लिमिटेडने दी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत नुकताच बँकअॅश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. यामुळे आता आयडीबीआय बँकेच्या एक हजार ८५० पेक्षा जास्त शाखांच्या २० मिलियन ग्राहकांना ‘न्यू इंडिया’च्या सर्वसाधारण विमा उत्पादनांचा लाभ घेता येईल. ‘न्यू इंडिया’च्या विमा योजना विविध प्रकारच्या जोखमींपासून आर्थिक संरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने खास तयार करण्यात आल्या आहेत.

या भागीदारीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आयडीबीआय बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या आणि जागतिक पातळीवर मजबूत स्थान असलेल्या नॉन-लाइफ इन्श्युरन्स कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रात या कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा १५ टक्के असून, किंमत आणि सेवा या दोन्ही बाबतीत आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात ही कंपनी मोलाची भूमिका बजावेल.  सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या अशा विमा कंपनीची विश्वसनीयता आणि कार्यक्षम कॉर्पोरेट प्रशासन यामुळे आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना अनेक विविध सर्वोत्कृष्ट उत्पादनांचा लाभ घेता येईल; तसेच फीच्या माध्यमातून बँकेच्या महसुलात लक्षणीय भर पडेल.’ 

दी न्यू इंडिया अॅश्युरन्सचे सीएमडी अतुल सहाय म्हणाले, ‘भारतातील सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पसरलेल्या विशाल नेट्वर्कमार्फत बँकिंग सेवा प्रदान करत असलेल्या कमर्शियल बँकांपैकी एक आयडीबीआय बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उत्पादनाच्या किंमतीबरोबरीनेच ग्राहकांचे लहान मोठे सर्व दावे तातडीने निकाली काढण्यावर आम्ही विशेष भर देतो. आम्ही असे मानतो की, या दोन्ही कंपन्यांचे संपूर्ण भारतात पसरलेल्या विशाल नेटवर्कचा लाभ घेत, माहिती तंत्रज्ञानामार्फत ग्राहकसेवांना प्राधान्य देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल.’

करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याच्या दिवशी ‘सुरक्षा कवच’ ही खास तयार करण्यात आलेली वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरू करण्यात आली. व्यक्ती तसेच व्यवसायांच्या विविध गरजा भागवण्यासाठी सक्षम असलेल्या इतर उत्पादनांच्या बरोबरीनेच ही पॉलिसीदेखील लवकरच उपलब्ध होईल. ग्रामीण व निम-शहरी भागांमध्ये आयडीबीआय बँकेने आपले स्थान मजबूत केले आहे. आता या भागीदारीमुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना ‘न्यू इंडिया’च्या विविध जोखमींना समजून त्यानुसार तयार केलेल्या विविध संरक्षक कव्हर्सचा लाभ घेता येईल. ‘न्यू इंडिया’चे विशाल वितरण नेटवर्क, तत्पर सेवा व दावे निकाली काढण्याचा अतिशय उत्तम रेकॉर्ड यांचेही लाभ बँकेच्या ग्राहकांना मिळतील. या भागीदारीमुळे ‘न्यू इंडिया’ला आपली नावीन्यपूर्ण उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील आणि जास्तीत जास्त ग्राहकांना कधीही, कोठूनही त्यांच्या जोखीम संरक्षण सेवांचा लाभ घेता येईल.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search