Next
‘वनराई’चा राज्यात दहा हजार झाडे लावण्याचा निर्धार
प्रेस रिलीज
Monday, July 09, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘महाराष्ट्रातील शाळा, वन विभागाच्या जागेचा परिसर आणि हरित वारी उपक्रमांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्धार वनराई संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. १० जुलै २०१८ रोजी ‘वनराई’चा ३२ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया वृक्षारोपण व संवर्धन अभियान राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.

वर्धापन दिनी संस्थेच्या आवारात पिंपळ वृक्षाची लागवड करून या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानाद्वारे कडुनिंब, चिंच, जांभूळ, आपटा, उंबर, वड, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे; तसेच त्याचे पुढील तीन वर्षे संवर्धनदेखील नित्यनियमाने केले जाणार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनादेखील या अभियानामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही एका किंवा अनेक वृक्षांचे पालकत्व स्विकारावे लागेल अथवा वृक्षदान करावे लागणार आहे.

धारिया म्हणाले, ‘वनराई ही केवळ संस्था न राहता भारतभूमीला ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवण्यासाठीचे एक जनआंदोलन बनले आहे. कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावे या हेतूने स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे दरवर्षी वर्धापन दिनी आयोजन करण्यात येते. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे, तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पहायला मिळणार आहे.’

‘प्रदर्शनात प्रामुख्याने विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावर व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचन साहित्य, मृदा-जल संवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालन असणार आहेत. याद्वारे नागरिकांना  कृतीपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य या प्रदर्शाद्वारे होईल,’ असा विश्वास धारिया यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link