Next
‘जाणीव’, ‘वंचित विकास’तर्फे गणेशोत्सव देखावे स्पर्धा
प्रेस रिलीज
Tuesday, August 21, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : जाणीव संघटना आणि वंचित विकास संस्था यांच्यावतीने गणेशोत्सवात पर्यावरण, पुण्यातील वाहतूक समस्या, सोशल मीडिया या विषयांवर प्रबोधनपर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रबोधनपर देखावे सादर करणाऱ्या गणेशमंडळांना प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाला अनुक्रमे १५ हजार, १० हजार व पाच हजार रुपये अशी रोख पारितोषिके व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. सहभागासाठी नोंदणी मोफत असून, नोंदणी करण्याची अंतिम तारीख बुधवार, दि.१२ सप्टेंबर आहे. 

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांनी संस्थेच्या नारायण पेठेतील मोदी गणपती जवळील कार्यालयात संपर्क साधावा.असे संचालिका मीना कुर्लेकर व सुनीता जोगळेकर यांनी कळविले आहे.

अधिक माहितीसाठी :  
वंचित विकास, ४०५/९, नारायण पेठ, मोदी गणपती मागे, पुणे ४११०३०   
दूरध्वनी क्रमांक – (०२०) २४४५४६५, (०२०) २४४८३०५०   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link