Next
फरहाद फोर्ब्ज ‘फॅमिली बिझनेस इंटरनॅशनल’च्या जागतिक अध्यक्षपदी
प्रेस रिलीज
Saturday, June 09, 2018 | 06:06 PM
15 0 0
Share this story

फरहाद फोर्ब्ज
पुणे : उत्पादन निर्मितीत ऊर्जाबचत करून, कारखान्यांचे कामकाज पर्यावरणपूरक करण्यासाठीचे तंत्र विकसित करणाऱ्या ‘फोर्ब्ज मार्शल’ या कंपनीचे सहअध्यक्ष फरहाद फोर्ब्ज यांची ‘फॅमिली बिझनेस इंटरनॅशनल’ या संस्थेच्या जागतिक अध्यक्षपदी निवड झाली आहे. या मानाच्या पदी निवड झालेले युरोपाबाहेरील ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

‘द फॅमिली बिझिनेस नेटवर्क’ ही कुटुंबांतील अनेक पिढ्यांनी चालवलेल्या व पुढे नेलेल्या व्यवसायांसाठी काम करणारी जागतिक स्तरावरील संस्था आहे. कुटुंबांनी चालवलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी ही संस्था प्रामुख्याने काम करते. स्विर्त्झलंडमधील लॉसान येथे संस्थेचे मुख्यलय असून, १९८९ पासून संस्था कार्यरत आहे. जगभरातील तब्बल तीन हजार ४०० व्यवसायिक कुटुंबे या संस्थेची सदस्य असून, ६५ देशांमध्ये संस्थेच्या ३१ शाखा आहेत. एकूण ११ हजार व्यावसायिक संस्थेचे सदस्य असून, यात चार हजार ५०० व्यक्ती कुटुंबाच्या नवीन पिढीच्या प्रतिनिधी आहेत. अशा भव्य संस्थेच्या जागतिक अध्यक्षपदी फरहाद फोर्बज यांची झालेली निवड देशाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.   

‘फोर्ब्ज मार्शल’ ही ‘स्टीम इंजिनिअरिंग’ आणि ‘कंट्रोल इंस्ट्रुमेंटेशन सोल्यूशन्स’ या क्षेत्रातील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. इतर उत्पादन व्यवसायांमध्ये अधिकाधिक पर्यावरणपूरकता आणण्यासाठीचे तंत्र ‘फोर्बज मार्शल’तर्फे विकसित केले जाते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link