Next
‘अॅक्सिस’-‘मास्टरकार्ड’तर्फे फॉरेक्स कार्ड ऑफर
प्रेस रिलीज
Thursday, April 19 | 02:18 PM
15 0 0
Share this story

मुंबई : देशाची तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने मास्टरकार्डबरोबर फॉरेक्स कार्ड वापरकर्त्यांसाठी खास योजना सादर केली आहे.

या योजनेनुसार अॅक्सिस बँक फॉरेक्स कार्डच्या ग्राहकांना मास्टरकार्डच्या सौजन्याने क्यिव्ह, युक्रेन येथे होणाऱ्या यूईएफए चॅंपियन्स लीग अंतिम फेरी २०१८ला उपस्थित राहाण्याची संधी जिंकता येणार असून, त्याअंतर्गत दोनजणांच्या सहलीचा पूर्ण खर्च केलेला असेल. विजेत्यांना २५० डॉलर्स रक्कम प्री-लोड केलेले फॉरेक्स कार्डही जिंकता येणार आहे.

ही योजना अॅक्सिस बँक फॉरेक्स कार्डच्या मास्टरकार्ड प्रकारांवर एक ते ३० एप्रिल २०१८ दरम्यान वैध असेल. क्यिव्ह, युक्रेन येथे होणाऱ्या यूईएफए चॅंपियन्स लीग अंतिम फेरी २०१८ला उपस्थित राहाण्याची संधी देणाऱ्या सर्वोच्च बक्षिसाखेरीज अधिकृत मर्कंडाइज आणि इतर बक्षिसेही दिली जाणार आहेत.

भारतातील फॉरेक्स कार्ड क्षेत्रात ४५ बाजारपेठ हिश्शासह अॅक्सिस बँक आघाडीवर आहे.

याविषयी बँकेच्या मुख्य विपणन अधिकारी आशा खाग्रा म्हणाल्या, ‘भारतीय फॉरेक्स कार्ड बाजारपेठेतील आघाडीची बँक या नात्याने आम्ही ग्राहकांना त्यांच्या सुट्टीच्या काळाचे अधिकाधिक मूल्य मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्नशील असतो. फॉरेक्स कार्ड सोबत ठेवून कॅशलेस राहाण्याबरोबरच सुरक्षितता व सोयीस्करपणा, इतर संभाव्य गरजा पूर्ण होण्याची सुविधा आदी फायदे मिळतात. आमची इतर कंपन्यांबरोबर असलेली भागिदारी, सहकार्य, तसेच आमच्या योजनांमुळे हे शक्य होते.’

‘प्रवास आणि फुटबॉलविषयी ग्राहकांना असलेल्या प्रेमाच्या लाटेवर सवार होत आम्ही ग्राहकांना युक्रेनमध्ये होणाऱ्या यूईएफए चॅंपियन्स लीगसाठी उपस्थित राहाण्याची अभूतपूर्व संधी देण्याचे आमचे लक्ष्य आहे. यामुळे फॉरेक्स भागीदार म्हणून आमचे स्थान बळकट होईल आणि त्याचवेळेस प्रवाशांना सुट्टीवर असताना कॅशलेस राहाण्याचे अधिकाधिक फायदे मिळवून देण्याचे आमचे वचन सार्थ ठरेल,’ असे त्यांनी सांगितले.

मास्टरकार्डचे दक्षिण आशिया अकाउंट व्यवस्थापनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास वर्मा म्हणाले, ‘या सह-विपणन भागिदारीसाठी आमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रायोजक मालमत्तांपैकी एक असलेल्या यूईएफए चॅंपियन्स लीगचा वापर करून अॅक्सिस बँकेसोबत भागिदारी करण्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मास्टरकार्डमध्ये आम्ही ग्राहकांना व त्यांच्या ग्राहकांना अमूल्य, पैशांनी विकत न घेता येणारे अनुभव मिळवून देण्यावर कायम लक्ष केंद्रित केले असून उच्चभ्रू वर्गात फुटबॉलची वाढती लोकप्रियता लक्षात घेता या भागिदारीमुळे अॅक्सिस बँक तसेच मास्टरकार्ड या दोन्हींचा फायदा होईल.’

अधिक माहितीसाठी :  https://www.axisbank.com/retail/forex/multi-currency-forex-card/download-forms
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link