Next
‘स्टार इंडिया’कडून केरळ पूरग्रस्तांना पाच कोटी
प्रेस रिलीज
Tuesday, August 21 | 04:07 PM
15 0 0
Share this story

केरळमधील पुरग्रस्तांसाठीचा मदतनिधी स्टार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. माधवन यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडे सुपूर्द केला.
मुंबई : केरळमधील पूरग्रस्तांसाठी स्टार इंडिया आणि स्टार प्रवाहने पाच कोटींचा मदतनिधी दिला आहे. स्टार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. माधवन यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडे नुकताच हा मदतनिधी सुपूर्द केला.

गेल्या शंभर वर्षांतील सर्वांत भीषण महापुराचा सामना सध्या केरळ करत आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. तिथल्या लोकांच्या मदतीसाठी (#AllForKerala) विशेष मोहीम राबवण्यात आली होती. स्टार इंडियाच्या हॉटस्टार आणि वेगवेगळ्या ५० वाहिन्यांमधील जवळपास साठ कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही या कॅम्पेनच्या माध्यमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जनतेला आवाहन केले.

‘केरळमधील पूरग्रस्तांना मदत करणं हे मी आमचं कर्तव्य समजतो. स्टारसारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही जनतेला केलेल्या आवाहनाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला’,असे स्टार इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदयशंकर यांनी सांगितले. 

स्टार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. माधवन म्हणाले, ‘केरळमधील सध्याची स्थिती खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जितकी मदत करणं शक्य आहे तितकी स्टार इंडियाच्या माध्यमातून केली जाईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link