Next
‘इंडियन पॅनोरमा’ महोत्सवात दहा मराठी चित्रपट
आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ चित्रपटाने उद्घाटन
BOI
Monday, January 07, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘इंडियन पॅनोरमा’ चित्रपट महोत्सवात एकूण दहा मराठी चित्रपट दाखविण्यात येत असून, महोत्सवाच्या उद्घाटनाच्या चित्रपटाचा मान आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ चित्रपटाला मिळाला आहे.  

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्यावतीने येथील सिरीफोर्ट ऑडिटोरियम मध्ये चार ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान ‘इंडियन पॅनोरमा’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, चार जानेवारी २०१९ रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. मराठी चित्रपट ‘खरवस’ आणि ‘वोलू’ या मल्याळम चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. अशी माहिती महान्यूजच्या बातमीत देण्यात आली आहे. 

दहा दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात एकूण ४७ चित्रपट दाखविण्यात येणार असून, यात दहा मराठी चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेखर रणखंबे दिग्दर्शित ‘पाम्फलेट’ आणि गौतम  वझे दिग्दर्शित ‘आईशप्पथ’ चित्रपट दाखविण्यात आले. तिसऱ्या दिवशी रविवारी नितेश पाटणकर दिग्दर्शित ‘ना बोले वो हराम’ हा चित्रपट दाखविण्यात आला. 

मंगळवारी, आठ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात स्वप्नील कपुरे दिग्दर्शित ‘भर दुपारी’ व प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘आम्ही दोघी’ हे  चित्रपट, तर दुपारच्या सत्रात प्रसन्न पोंडे दिग्दर्शित ‘सायलेंट स्क्रिम’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

गुरूवारी, १० जानेवारी रोजी सायंकाळच्या सत्रात सुहास जहागिरदार दिग्दर्शित ‘येस, आय एम माऊली’ तर शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ हा चित्रपट आणि शनिवारी सकाळच्या सत्रात मेधपर्णव पवार दिग्दर्शित ‘हॅप्पी बर्थडे’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search