Next
‘चित्रपटाची दर्जात्मक निर्मिती आणि प्रसिद्धी महत्त्वाची’
निर्माते अनिश जोग, रणजीत गुगळे यांचे मत
BOI
Thursday, June 27, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

अनिश जोग आणि रणजीत गुगळे

पुणे : यशस्वी चित्रपटांची संख्या नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्या पैकी एक म्हणजे निर्माते एका चित्रपटानंतर पुन्हा निर्मितीकडे फिरकत नाहीत. फार कमी निर्माते याला अपवाद आहेत. सातत्याने उत्तम चित्रपट निर्मिती करत असलेली एक जोडी म्हणजे अनिश जोग आणि रणजीत गुगळे. या दोघांनी ‘डबलसीट’, ‘मुरांबा’नंतर आता ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

चित्रपट निर्मितीच्या या ध्यासामागचे रहस्य उलगडताना  ते म्हणाले, ‘ चित्रपट निर्मिती हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे, असे आम्ही मानतो. आमचे इतर व्यवसाय असले तरी त्यात अडकून न पडता आम्ही चित्रपट निर्मितीला वाहून घेतले आहे. यामुळे आम्हाला चांगले विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. आमच्या यशामागे उत्तम कथेची दर्जात्मक निर्मिती आणि योग्य प्रमोशन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आम्ही चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनसह प्रमोशनवर अधिक काम करतो. निर्मितीमूल्य, तांत्रिक दर्जा जपत ज्या प्रेक्षकांसाठी चित्रपट तयार केला त्यांच्यापर्यंत तो पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याची योग्य प्रसिद्धी अत्यंत आवश्यक ठरते. चित्रपटाचा विषय आमच्यापुढे आल्यावर लेखक, दिग्दर्शक अनुभवी आहे की नाही याचा विचार न करता आम्ही कथेचा विचार करतो, त्या चित्रपटाचा विषय किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि दिग्दर्शकाचे व्हिजन आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते.’

‘आमचा आगामी चित्रपट ‘गर्लफ्रेंड’ येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. उपेंद्र सिधये लिखित, दिग्दर्शित हा एक रॉमकॉम शैलीतील चित्रपट आहे. एखाद्या रॉमकॉम चित्रपटाला जी निर्मितीमूल्ये हवीत ती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आम्हाला खात्री आहे.’

जाहिरातपटापासून सुरुवात केलेल्या अनिश जोग यांनी वेगळी वाट निवडत चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकले. ‘नवा गडी, नवं राज्य’ या नाटकाच्या निर्मितीनंतर त्यांनी याच कथेवर आधारीत ‘टाइम प्लीज’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनतर ‘डबलसीट’, ‘वाय झेड’, ‘मुरांबा’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट केले, तर चित्रपट क्षेत्राशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कुटुंबातून आलेल्या रणजीत गुगळे यांनी नाटक, सिनेमाच्या आवडीमुळे आधी चित्रपट व्यवस्थापन क्षेत्रात आणि नंतर अनिश जोग यांच्यासोबत चित्रपट निर्मितीत प्रवेश केला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search