Next
कोहली, रोनाल्डो ‘हार्ड टू लेट गो’चे ब्रँड अँबेसेडर
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 05:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रॅव्हल गियर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टूरिस्टरने चॅम्पियन फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मास्टर ब्लास्टर क्रिकेटर विराट कोहली यांना नुकतेच आपले ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले असून, अमेरिकन टूरिस्टरच्या जाहिरातीत या दोघांना एकत्र काम करताना बघायला मिळणार आहे.

या प्रसंगी सॅमसोनाईट साऊथ एशियाचे सीईओ जय कृष्णन यांनी बोलताना सांगितले की, ‘आमच्या नव्या जाहिरातीचे क्रिस्टियानो आणि विराट हे नवे ब्रँड अँबेसेडर असल्याचा आम्हाला आनंदच असून, ते आमच्या अमेरिकन टुरिस्टर ब्रँड आणि आमच्या क्युरिओ प्रॉडक्ट्सचे प्रतिनिधित्व करतात. मला पूर्ण विश्वास आहे की, आमच्या ब्रँडप्रति प्रेम दर्शवणाऱ्या या दोन महान व्यक्तींमुळे अमेरिकन टुरिस्ट भरपूर यश संपादन करेल.’

या वेळी आपले अनुभव सांगताना कोहली म्हणाला, ‘अमेरिकन टुरिस्टरबरोबर हा माझा तिसरा कॅम्पेन शूट असून, या ब्रॅंडला मी मनापासून पसंद करतो. एक फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असल्यामुळे अमेरिकन टुरिस्टरच्या जाहिरातीत दिलेला संदेश हा अतिशय उत्तम आहे. प्रत्येक प्रवासी प्रवासात आपल्या लगेजची काळजी घेतो आणि आपले लगेज आपल्या जवळ ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अमेरिकन टुरिस्टरने हा विचार आपल्या जाहिरातीतून उत्तमरीत्या मांडला आहे.’

क्रिस्टियानो म्हणाला, ‘अमेरिकन टुरिस्टरचा ब्रँड अँबेसेडर बनून मला खूप आनंद झाला असून, हे एक उत्साही ट्रॅव्ह्लर असण्याबरोबरच मला याचे सुटकेस आणि ऍक्टिव्ह लाइफस्टाइलसुद्धा पसंद आहे. तसेच या जाहिरातीबद्दल माझ्या चाहत्यांचे मत जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.’

अमेरिकन टुरिस्टरची ही नवी जाहिरात प्रेक्षकांचा या ब्रॅंडप्रतीचा विश्वास आणि प्रेम व्यक्त करते. क्युरिओ लगेज सिरीजचे काही वायब्रेंट एडिशनपण या जाहिरातीत प्रस्तुत केले असून, हे क्युरिओ स्पिनर्स लेमन, क्रोम, स्पाइसी पीच आणि डेनिम ब्ल्यू रंगात उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link