Next
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘होरांगी’चे यश
प्रेस रिलीज
Thursday, January 10, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this story

आनंद व्यक्त करताना पदकविजेते खेळाडू.

पुणे : वडगावशेरी येथील होरांगी तायक्वांदो अॅकॅडमीच्या खेळाडूंनी कलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘पुमसे’ या क्रीडा प्रकारात यश मिळवले. कलकत्ता येथील जिओंग तायक्वांदो अॅकॅडमी आणि कोरिया तायक्वांदो अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत ‘होरांगी’च्या अन्वी बांगर व अविरल त्रिपाठी यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रिया भापकर हिने रौप्यपदक, तर तनिष्क बांगर, आविन पिलाकुडी, सुमेधा साखरे, सिद्धू क्षेत्री, जीत मुझुमदार, क्रिश केदगोणी, मानस पसारकर, इशिता बर्नवाल, प्रणव भापकर आणि सारंग सरागे यांनी कांस्यपदक पटकावले. सांघिक पुमसे प्रकारात तनिषा मुदलियार, प्रीत वांद्रे, मानस पसारकर यांनी नेपाळच्या संघाला पराभूत करीत कांस्यपदक मिळवले.

सलग तिसऱ्या वर्षी अॅकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत पदकांची कमाई केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या गितीका गुणशेट्टी, शौनक पांडे, पार्थ रेगे, शैनेश कुट्टन यांनीदेखील त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंशी चुरशीची लढत दिली. या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, मलेशिया, बांगलादेश, नेपाळ, कोरिया, भूतान, इंडोनेशिया आदी देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताकडून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत व परदेशातून एकूण ९०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.

होरांगी तायकवांदो अॅकॅडमीचे अध्यक्ष मास्टर बाळकृष्ण भंडारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. रवींद्र भंडारी, कपिल अनमल, खुशबू तिवारी, सिद्धू क्षेत्री यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link