रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (जीजीपीएस) सोसायटीच्या घटक संस्थेतर्फे नववीतील विद्यार्थ्यांसाठी २२ जानेवारी २०१९ रोजी ‘बालसंसद सत्र’ आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सत्रात ‘माझा शिक्षणाचा हक्क आणि शिक्षण कशासाठी’ या विषयावर चर्चा करण्यात आली, तर दुसऱ्या सत्रात ‘आजचा विद्यार्थी सुरक्षित आहे का’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली.
ही बालसंसद आयोजित करण्यासाठी शाळेच्या पालक प्रतिनिधी अॅड. प्रिया लोवलेकर यांनी प्रयत्न केले. त्यांना रत्नागिरी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आनंद सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले. ज्येष्ठ समाजसेविका सुनिता पाटणकर, आनंद सामंत, अॅड. लोवलेकर यांनी संपूर्ण सत्र उत्तमरीत्या हाताळले.
या बालसंसदेची संपूर्ण कल्पना संस्थेच्या कार्याधाय्क्षा शिल्पा पटवर्धन यांची होती. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, ज्येष्ठ शिक्षिका पद्मजा सावंत, सहाय्यक शिक्षक प्रमोद कदम, महेश मुळे, श्रावणी सरदेसाई, अश्विनी भाटकर, सुविधा तोडणकर यांनी मेहनत घेतली. संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे आणि पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.