Next
मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा पुण्यात सुरू
प्रेस रिलीज
Friday, May 25, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this story


मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग सेवेच्या उदघाटनप्रसंगी विभोर जैन, रिकी केज, नरेंद्र साळुंखे, रविंद्र ढवळे, रामनाथ सुब्रमणियन आदी

पुणे : जगातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग कंपनीने पुण्यात आपली सेवा सुरू केली आहे. पुणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासन एजन्सीजच्या सहकार्याने भारतात पहिल्यांदा मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा सुरू झाली आहे. मोबाईक वापरकर्त्यांना कुठलेही डिपॉझिट न भरता २० मिनिटांच्या रायडींगसाठी १० रुपये, तर ९९ रुपयाच्या मासिक पास खरेदीवर अमर्यादित राइडस मिळणार आहेत. 

या वेळी मोबाईकचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन प्रमुख मार्क लिन म्हणाले, ‘आम्ही भारतात प्रथमच पुण्यात सेवा सुरू करून आनंदित आहोत. मोबाईकने जागतिक सायकल शेअरिंग संस्कृती विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. मोबाईककडे ९० लाखांपेक्षा अधिक सायकली असून, १६ देशांमधील २०० पेक्षा अधिक शहरांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. पुण्यात आमची सेवा फक्त या प्रवासाची सुरुवात आहे. कोथरूडमध्ये मोबाईकची स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा सुरु करण्यात आली आहे. सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या, कोथरूडला सायकलिंगसाठी अनुकूल उपनगर म्हणून ओळखले जाते आणि येथे  राहणारे लोक फिटनेस-जागरूक आहेत.’

‘मोबाईक स्मार्ट सायकलमध्ये स्मार्ट लॉक तंत्रज्ञान, स्टेनलेस शाफ्ट ड्राइव्ह ट्रान्समिशन, ट्यूबलेस टायर, जीपीएस अशा अनेक सर्वोत्कृष्ट सोयी अनुभवायला मिळतील. वापरकर्ता मोबाईक अॅ्प डाऊनलोड करून जवळपासची मोबाईक शोधू शकतात आणि क्युआर कोड स्कॅन करत, अनलॉक करून राईडचा आनंद घेऊ शकतात. मोबाईकचे पेमेंट करताना ग्राहक नेट बँकिंग, कार्ड्स, वॉलेट व यूपीआय पेमेंट पध्दतीसारख्या अनेक डिजिटल पेमेंटसचा वापर करू शकतात’, असेही लिन यांनी नमूद केले.

मोबाईकचे सीबीओ सुजीथ नायर म्हणाले, ‘सायकलिंगसाठी पुणे शहरात विविध स्थळ असून, येथील वातावरण आणि पायाभूत सुविधा कंपनीचा विस्तार करण्यासाठी अतिशय योग्य आहे.’ 

पुणे प्रशासनाने २०१६ मध्ये वाहतूक पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे सायकल योजना सुरू केली आहे. त्याला चालना देण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि मोबाईक यांनी एक सामंजस्य करार केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link