Next
‘महात्मा गांधी सेंटर फॉर युनिव्हर्सल व्हॅल्यूज’ची स्थापना
BOI
Tuesday, August 27, 2019 | 04:03 PM
15 0 0
Share this article:

‘महात्मा गांधी सेंटर फॉर युनिव्हर्सल व्हॅल्यूज’च्या उद्घाटनप्रसंगी चंदू बोर्डे, आफताब सेठ, डॉ. शोभा सुपेकर, राजीव बन्सल, वैशाली बोर्डे आदी.

पुणे : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने हडपसर येथे नव्याने सुरू केलेल्या स्मार्ट कॅम्पसमध्ये ‘महात्मा गांधी सेंटर फॉर युनिव्हर्सल व्हॅल्यूज’ची स्थापना केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनचे सह-संस्थापक व माजी अध्यक्ष चंदू बोर्डे, ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनचे अध्यक्ष आफताब सेठ, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. शोभा सुपेकर, ‘जीआयआयएस इंडिया’चे संचालक राजीव बन्सल व ‘जीआयआयएस इंडिया’च्या वैशाली बोर्डे यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले.  
 
भविष्य घडविण्याची जबाबदारी ज्यांना पेलायची आहे, अशा आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात गांधीजींची विचारसरणी रुजावी या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

या वेळी राजीव बन्सल म्हणाले, ‘शांती आणि सद्भावनेचा संदेश संपूर्ण जगभरात पोहोचवतील, असे सदिच्छादूत बनण्यासाठी संतुलित विचारसरणी असलेले वैश्विक नागरिक घडविणे हा आमचा उद्देश आहे. महात्मा गांधी यांचे जीवनानुभव व त्यांची शिकवण यांच्यामार्फत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शांततापूर्ण जीवन तत्त्वे रुजावीत यासाठी ‘ग्लोबल इंडियन महात्मा गांधी सेंटर फॉर युनिव्हर्सल व्हॅल्यूज’ वचनबद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि आमचा विशेष अभ्यासक्रम यांची को-स्कोलिस्टिक अॅक्टिव्हिटीजसोबत सांगड घालून आम्ही मुलांना समाजाबद्दल जास्तीत जास्त जागरूक बनवतो, अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविले जावे यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे आमचा कल आहे.’ 


चंदू बोर्डे यांनी क्रिकेट खेळाडू म्हणून आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले, तर आफताब सेठ यांनी गांधीजींच्या तत्त्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. डॉ. शोभा सुपेकर यांनी आजच्या जगामध्ये गांधीजींचे तत्त्वज्ञान कसे महत्त्वाचे आहे, ते सांगितले. डॉ. सुपेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. लक्ष्मी प्रसन्न यांना ‘स्पेशल डिजिटल मल्टीमीडिया किट ऑन महात्मा गांधी’ ही विशेष भेट दिली.

विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.    
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search