Next
श्री साई सेवा मित्रमंडळातर्फे ‘दसरा उत्सव’
BOI
Monday, October 22 | 11:37 AM
15 0 0
Share this story

नाचणे येथील श्री साईनाथ मंदिरात ‘स्वरगंधार’ मैफल रंगवताना गुरुदेव नांदगावकर, श्‍वेता जोगळेकर, विवेक बापट, महेंद्र पाटणकर. सोबत संगीतसाथीला राजू धाक्रस, अद्वैत मोरे, हेमंत परांजपे, मंगेश मोरे आणि राकेश सागवेकर.

रत्नागिरी : नाचणे येथील श्री साई सेवा मित्रमंडळातर्फे ‘दसरा उत्सव’ साजरा करण्यात आला. या वेळी श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या समाप्तीचे औचित्य साधून नाचणे-गोडाउन स्टॉप येथील श्रीसाईनाथ मंदिरात चौकोन प्रस्तुत ‘स्वरगंधार’ मैफलीचे आयोजन केले होते. मैफलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या समाप्तीनिमित्त पहाटे काकड आरती, पूजा अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी ‘स्वरगंधार’ ही भाव-भक्ति-नाट्य गीतांची मैफल रंगली. गुरुदेव नांदगावकर, श्‍वेता जोगळेकर, विवेक बापट यांनी ‘गणपती गणराज’, ‘तूच गजानन तूच साई’, ‘जय शारदे वागीश्‍वरी’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘पद्मनाभा नारायणा’ या भक्तिगींबरोबरच ‘प्रीतीचा कल्पतरू’, ‘श्रीरंगा कमलाकांता’ आदी नाट्यपदे तसेच ‘काटा रुते कुणाला’, ‘जीवा-शिवाची बैलजोड’, ‘अनादी निर्गुण’ आदी बहारदारगीते सादर करून रसिकांचा मंत्रमुग्ध केले.

या मैफलीला महेंद्र पाटणकर यांच्या माहितीपूर्ण निवेदनाची जोड लाभली. मैफलीसाठी राजू धाक्रस (तबला), अद्वैत मोरे (तालवाद्य), हेमंत परांजपे (पखवाज-ढोलकी), मंगेश मोरे (सिंथेसायझर) आणि राकेश सागवेकर (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. गौरव सावंत यांनी ध्वनिसंयोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link