Next
पुण्यात साकारतेय सर्वांत मोठे प्रदर्शन केंद्र
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story

मगरपट्ट्यातील लक्ष्मी लॉन्सवर ‘मेस्से ग्लोबल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर’ विकसित केले जात आहे. त्याची घोषणा  करताना ‘एक्झिकॉन’चे व्यवस्थापकीय संचालक एम. क्यू.सईद, शिरीष मगर व ‘मगरपट्टा सिटी’चे संस्थापक सतीश मगर
पुणे : भारतातील आघाडीची मल्टीसिटी इव्हेंट व्हेन्यू कंपनी असलेल्या ‘मेस्से ग्लोबल’तर्फे येथील मगरपट्ट्यातील लक्ष्मी लॉन्सवर ‘मेस्से ग्लोबल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर’ विकसित केले जात आहे. ‘लक्ष्मी लॉन्स’ व ‘एक्झिकॉन ग्रुप’ यांच्या या संयुक्त उपक्रमाची घोषणा नुकतीच येथे एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी ‘एक्झिकॉन’चे व्यवस्थापकीय संचालक एम. क्यू.सईद, ‘मगरपट्टा सिटी’चे संस्थापक सतीश मगर, शिरीष मगर उपस्थित होते. 

यासंदर्भात ‘एक्झिकॉन’चे व्यवस्थापकीय संचालक एम. क्यू. सईद म्हणाले, ‘पुण्यातील सर्वांत मोठे बहूद्देशीय स्थळ बांधणे, चालवणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी ‘एक्झिकॉन’ने ‘लक्ष्मी लॉन्स पुणे समवेत सहयोग केला आहे. हे केंद्र लक्ष्मी लॉन्स येथील सध्याच्या कार्यक्रमांना सेवा पुरवेलच, पण पुण्यातील सर्वोत्तम आणि सर्वांत मोठ्या प्रदर्शनांनाही याठिकाणी घेऊन येईल.’

 ‘मगरपट्टा सिटी’चे संस्थापक सतीश मगर म्हणाले, ‘पुणे शहराची प्रगतिशील अर्थव्यवस्था व नजिकच्या भविष्यात येणारे नवनवे उद्योग पाहता युरोपीय आधुनिक तंत्रशैलीयुक्त जागतिक दर्जाचे प्रदर्शन व परिषद केंद्र शहरात असण्याची बर्याैच काळापासून तीव्र गरज होती. ‘मेस्से ग्लोबल’समवेत आमचा हा संयुक्त सहयोग पुणे शहरासाठी वरदान ठरणार असून पुणेकरांसाठी जगातील सर्वोत्तम कार्यक्रम आकर्षित करण्यात मदत करेल.’

‘हे केंद्र कार्यक्रमांसाठी येत्या मे  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खुले होणार आहे. हे केंद्र हडपसर येथील मगरपट्ट्यातील पंधरा एकरांहून अधिक क्षेत्रांवर पसरलेल्या हिरव्यागार कुरणातील सध्याच्या लक्ष्मी लॉन्सवर बांधले जात आहे. प्रदर्शने, परिषदा, कंपन्यांचे कार्यक्रम व विवाह समारंभ यासाठी हे ठिकाण परिपूर्ण ठरेल. ‘मेस्से ग्लोबल पुणे’ हे पुण्यातील असे पंचतारांकित ठिकाण ठरेल जेथे अडीच हजार  हून अधिक वाहने पार्क करण्याची सुविधा असेल.’ असे शिरीष मगर यांनी सांगितले.

‘एक्झिकॉन ग्रुप’ हा १९९६ पासून व्यापारी प्रदर्शने उद्योगाला उत्पादने व सेवांची संपूर्ण श्रेणी पुरवणारा भारतातील आघाडीचा उद्योग आहे. ‘मेस्से ग्लोबल’ ही ‘एक्झिकॉन ग्रुप’मधील कंपनी ही जर्मनीकडून प्रेरणा घेतलेली मल्टीसिटी इव्हेंट व्हेन्यू कंपनी आहे. भारतामध्ये २०२२ पर्यंत आणखी १४ प्रदर्शन व परिषद केंद्रे विकसित करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या या कंपनीच्या ताब्यात पंजाबमधील सर्वांत मोठे कार्यक्रम ठिकाण असलेल्या मोहाली (चंडीगड) येथे दीड लाख चौरस फूट बहुद्देशीय क्षेत्र आहे. त्याखेरीज कंपनीने नागपूरमध्येही सर्वांत मोठे खासगी मालकीचे बहुद्देशीय ठिकाण विकसित करण्यासाठी जमीन संपादित केली आहे. नागपूरच्या या प्रकल्प स्थळाचे काम एप्रिल २०१९ मध्ये सुरु होणार आहे’, असे सईद यांनी नमूद केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link