Next
टाटा मोटर्सच्या कामगार संघटनेची निवडणूक शांततेत
BOI
Tuesday, June 25, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पिंपरी चिंचवडमधील उद्योगक्षेत्राचे लक्ष वेधून घेणारी टाटा मोटर्स एम्पलॉईज युनियनची (टीएमईयू) निवडणूक शनिवारी शांततेत पार पडली. पुढील तीन वर्षांसाठी १५५ उमेदवारांमधून ३१ प्रतिनिधी निवडण्यात आले. ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही महाराष्ट्रातील एक सर्वांत मोठी कर्मचारी युनियन आहे.

या संघटनेत सहा हजार ५०० हून अधिक सदस्य असून, ९९ टक्के सदस्यांनी मतदान केले. यातील ११ प्रतिनिधी आधीच्या कमिटीमधील आहेत. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया टाटा मोटर्स एम्पलॉईज युनियनने नियुक्त केलेल्या आठ सदस्यीय निवडणूक समितीने पाहिली. ही निवडणूक प्रक्रिया टाटा मोटर्सच्या पिंपरी, चिंचवड व चिखली या कारखान्यांमध्ये पार पडली. 

निवडणूका खेळीमेळीच्या वातावरणात, शांततेत पार पडल्याबद्दल निवडणूक समितीचे अध्यक्ष विजय सुदर्शनी यांनी समाधान व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search