Next
राजकीय पक्षांना प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप
प्रेस रिलीज
Monday, April 01, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप करण्यात आले आहे. आयोगामार्फत सात राष्ट्रीय आणि ५२ राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे. सात राष्ट्रीय पक्षांना प्रचारासाठी  राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण ६०० मिनिटे मिळतील, तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण ९०० मिनिटे मिळतील. ५२ राज्यस्तरीय पक्षांना प्रचारासाठी प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण एक हजार ८०० मिनिटे मिळतील, तर राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण ५२० मिनिटे मिळतील.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय पक्षाला दूरदर्शनवर प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवर १० तास टप्प्याटप्प्याने मिळतील, तर १५ तास प्रादेशिक वाहिनीवर मिळतील. राज्यस्तरीय पक्षाला प्रादेशिक वाहिनीवर ३० तास प्रचारासाठी मिळतील. राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे आठ तास ४० मिनिटेही प्रचारासाठी मिळतील. राष्ट्रीय पक्षाला आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावर प्रचारासाठी १० तास, तर प्रादेशिक वाहिनीवर १५ तास मिळतील. राज्यस्तरीय पक्षाला आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर ३० तास प्रचारासाठी मिळतील. या शिवाय राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे आठ तास ४० मिनिटेही प्रचारासाठी मिळतील.

नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते शेवटच्या टप्प्यातील निवडणुका होईपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त असलेले पक्ष जेव्हा आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरून करतील तेव्हा त्यांनी त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळावे लागतात.

राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून, त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म, तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search