Next
‘टच अ लाईफ फाउंडेशन’तर्फे विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप
प्रेस रिलीज
Thursday, July 05, 2018 | 06:13 PM
15 0 0
Share this story

‘टच अ लाईफ फाउंडेशन’चे संस्थापक नरेश सुराणा व सदस्य नेहा पवार
पुणे : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पध्दतीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘टच अ लाईफ फाउंडेशन’तर्फे(टीएएलएफ) ‘बुक्स फॉर चेंज’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे मुलांनी आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडू नये यासाठी त्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येते. गेल्या वर्षी तीन हजार विद्यार्थ्यांना २५ हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वर्षी तीस हजार पुस्तकांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे’, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक नरेश आणि सीमा सुराणा यांनी दिली. 

नरेश आणि सीमा सुराणा गेली वीस वर्षे हाँगकाँगमध्ये स्थायिक असून, गेल्या दहा वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सहभागी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते भारतातील छोटी गावे आणि तेथील शिक्षणव्यवस्था याचा ते अभ्यास करत आहेत आणि विविध उपक्रम राबवत आहेत.  

सीमा सुराणा म्हणाल्या, ‘दुर्गम ठिकाणी असलेल्या शाळा व विद्यार्थ्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करणे हे ‘टच अ लाईफ फाऊंडेशन’चे ध्येय होते. संबंधित देणगीदार, एनजीओ, शाळा व स्वयंसेवक हे या पोर्टलशी जोडले जाणार असून, मुलांना आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगार यासाठी मदत करणार आहेत. आतापर्यंत २५ शाळांच्या माध्यमातून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली असून, ही माहिती डिजिटल रूपात उपलब्ध करण्याचे ध्येय आहे. आगामी वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘टीएएलएफ’शी संबंधित त्याची सर्व माहिती पुरविणारे ओळखपत्र तयार करण्यात येईल. या आयडी कार्डच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला क्युआर कोड देण्यात येणार असून, त्यांना देण्यात येणारी पुस्तक किंवा इतर सेवा याची माहिती डिजिटली ट्रॅक करण्यात येणार आहे. 

‘या कार्यासाठी नेहा पवार, नीलीमा लडकत, डिंपल सोमजी, गणेश झेंडे व हिरेन दोंडा या स्वयंसेवकांचे सहकार्य  लाभत आहे’, असेही सीमा सुराणा यांनी आवर्जून नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link