Next
पुणेकरांनी अनुभवला पुनश्च शिवकाल..
शिवजन्मोत्सव स्वराज्यरथाची भव्य मिरवणूक
BOI
Tuesday, February 19, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : कोल्हापूरच्या भवानी मंडप प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ७५ स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांचे सादरीकरण, ५१ रणशिगांची ललकारी, शिवगर्जना ढोलताशा पथकाचा रणगजर, ओम नमो: परिवर्तन महिला पथकाचे लेझीम, हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष यामुळे पुणेकरांनी पुन:श्च एकदा जणू शिवकाल अनुभवला. निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून काढण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथाच्या भव्यदिव्य मिरवणुकीचे. 

मिरवणुकीच्या सुरुवातीला लालमहाल चौकात अमर जवान स्तंभ येथे पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समितीचे संस्थापक अमित गायकवाड, श्रीमंत छत्रसाल महेंद्रसिंग महाराज, राघवेंद्रसिंग महाराज बुंदेला, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, बीव्हीजीचे ग्रुपचे हणमंत गायकवाड, आमदार शशिकांत शिंदे, उद्योजक युवराज ढमाले, रोहित पवार, प्रवीण तरडे, समन्वयक सुनील मारणे आदी मान्यवरांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ-शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलित करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. 

(पुण्यात शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link