Next
रत्नागिरीतील ‘किड्स फोटोग्राफी’ प्रदर्शन पाहिलंत का?
BOI
Sunday, August 18, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
जागतिक छायाचित्रण दिनाचे (१९ ऑगस्ट) औचित्य साधून रत्नागिरीत ‘किड्स फोटोग्राफी’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेने हे प्रदर्शन आयोजित केले असून, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन रत्नागिरीकरांना पाहण्यासाठी खुले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १८ ऑगस्टला उद्योजक मुकेश गुप्ता यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनातील बालकांचे निरागस, गोंडस फोटो पाहून सर्वांनाच बालपणीचा काळ आठवला. सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन पाहता येणार आहे.प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे, उपाध्यक्ष साईप्रसाद पिलणकर, सचिव सुबोध भोवड यांच्यासमवेत राजापूरचे छायाचित्रकार चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला, संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. त्यानंतर जलतरण तलावावर पोहण्याची स्पर्धा झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर ‘म्हाडा’चे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी या वेळी उपस्थित होते. आमदार सामंत यांनीही या वेळी बॅटिंगचा आनंद लुटला. ‘व्हिडिओग्राफर्स व फोटोग्राफर्सनी खेळाच्या माध्यमातून फिटनेस राखला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे,’ असा सल्ला आमदार सामंत यांनी दिला. या वेळी अजय बाष्टे यांनी सामंत यांचा सत्कार केला.

१९ ऑगस्टला सकाळी १० वाजता सावरकर नाट्यगृहात कॅमेरा पूजन व गुणगौरव, विद्यार्थ्यांचा सत्कार, ११ वाजता छायाचित्रकारांचे चर्चासत्र, १२ वाजता वृक्षारोपण, सायंकाळी चार वाजता बक्षीस समारंभ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यातून जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे, असे संस्थेतर्फे कळवण्यात आले.

(प्रदर्शनाची व्हिडिओ झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search