Next
इंदुमती गणेश यांचा पत्रकारिता विभागातर्फे सत्कार
BOI
Wednesday, July 24, 2019 | 02:33 PM
15 0 0
Share this article:

इंदुमती गणेश यांचा पत्रकारिता विभागातर्फे सत्कार करताना विभागप्रमुख डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव व डॉ. सुमेधा साळुंखे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या माजी विद्यार्थीनी आणि दैनिक ‘लोकमत’ च्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती गणेश यांना राज्यशासनाचा कोल्हापूर विभागासाठीचा ‘पुढारी’कार ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातर्फे इंदुमती गणेश यांचा सत्कार करण्यात आला. 

विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांच्या हस्ते इंदुमती यांना विद्यापीठाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी डॉ. शिवाजी जाधव आणि डॉ. सुमेधा साळुंखे उपस्थित होते.

इंदुमती गणेश या सांस्कृतिक आणि धार्मिक घडामोडींचे वार्तांकन करतात. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याच्या अंमलबजावणीत विलंब, कोल्हापूर चित्रनगरी असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. पत्रकारितेतील त्यांच्या या कामाची दखल घेत राज्यशासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीने २०१८ साठीच्या ‘पुढारी’कार ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

इंदुमती गणेश म्हणाल्या, ‘पत्रकारिता आव्हानात्मक क्षेत्र आहे. सत्याची बाजू घेऊन पत्रकारांनी उभे राहावे. समाजातील विविध घटकांतून पत्रकारांना माहिती मिळत असते. समाजाच्या हिताची माहिती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवावी. अनेक तरूण मुली पत्रकारितेत येत आहेत. मुलींना विवाहानंतर पत्रकारितेत करिअर करताना काही अडचणी जरूर येतील; परंतु त्यांनी डगमगून न जाता अडचणींवर मात करावी. विविध प्रश्नांडचा खोलात जाऊन अभ्यास करावा. यातून चांगले विषय वाचकांपर्यंत जातील’.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search