Next
‘राष्ट्रसेविका समिती’तर्फे विविध कार्यक्रम उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, April 22, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीच्या संस्कार वर्गाच्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी परिसरातील विविध शाखांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

उमा दांडेकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेला वंदन करण्याची पद्धत व गुढी पाडव्याची महती सांगून नात्याचे महत्त्व विशद केले. रियाने श्‍लोक सांगितल्यानंतर मुलींनी मारुतीस्तोत्र म्हटले व विविध खेळ घेतले. राम जन्मोत्सवानिमित्त रामरक्षा पठण आणि हनुमान स्तोत्र म्हणण्यात आले. त्यानंतर ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ या विषयावर मानसी डिंगणकर यांनी मार्गदर्शन केले. वेगवेगळी उदाहरणे, गोष्टीतून त्यांनी आपण आपल्याला काही बंधने घालून आयुष्य कसे समृद्ध करू शकतो, हे सांगितले. सुनेत्रा जोशी यांनी परिचय करून दिला. विद्या पटवर्धन यांनी डिंगणकर यांचा पुस्तक आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. 

भवानी शाखेतर्फे रामनवमी उत्सव झाला. सेविकांनी श्री. बोटले यांच्या घरी श्री रामाची पूजा, देवी अष्टभुजा पूजन व आरती करून पाळणा, स्तोत्रे म्हटली. श्रीमती अर्चना यांनी गुढी पाडवा ते राम नवमी या काळात समितीतर्फे झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. संजीवनी भागवत यांनी ‘सावधानता’ या विषयावर अनेक उदाहरणे देऊन कीर्तन केले. पूर्वरंगात महिपती महाराजांचा सत्वर सावध व्हावे हा अभंग निरूपणाला घेतला. समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, मार्कंडेय यांची उदाहरणे दिली. उत्तररंगात श्री राम चरित्र कथन केले. ‘बोले तैसा चाले’, ‘विचार करून निर्णय घ्यावा’, ‘योग्य संगत करावी’, ‘शिस्त हवी’, ‘समाजाला पूरक राहावे’ मग रामाचे चरित्र अगदी थोडक्यात मांडले. जिजामाता शाखेच्या सेविका श्रीमती पाध्ये यांनी ‘श्रीराम चंद्रा करुणा समुद्रा’ हे गीत ऐकवले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search