Next
सॉफ्टवेअर बनले दिव्यांगांचा आधार
BOI
Monday, September 17, 2018 | 04:55 PM
15 0 0
Share this storyसोलापूर :
सोलापूर येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिव्यांग व्यक्तींना उपयोगी ठरेल असे ‘ दिव्यांग आधार’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी केल्यानंतर दिव्यांगांना शासकीय योजना, तसेच सामाजिक संस्थांची आणि नोकरीसंदर्भातील माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते. दिव्यांगांचा त्रास कमी करणारे हे सॉफ्टवेअर विकसित केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी शाखेच्या उमाकांत तोखी, प्रसन्न जोशी, शेहजाद मनियार, लुकमन दलाल या विद्यार्थ्यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून, विविध सामाजिक संस्थांकडून या सॉफ्टवेअरला पसंती मिळाली आहे. ‘आधार’सारखे दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर  सध्या उपलब्ध नसल्याने या सॉफ्टवेअरची मागणी वाढत असल्याचे उमाकांत तोखी यांनी सांगितले. 

या सॉफ्टवेअरमध्ये दिव्यांग व्यक्तींनी स्वतःची माहिती एकदा भरावी लागते. त्यानंतर सॉफ्टवेअर त्या व्यक्तीला शासनाच्या राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देते. शासनाच्या विविध डेटाबेसमध्ये या दिव्यांग व्यक्तींची माहिती नोंदली जाते. त्यानंतर सामाजिक संस्था व समाजकल्याण विभागामार्फत त्या दिव्यांग व्यक्तीला मदतीची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते.

‘महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील विद्यार्थांनी बनविलेल्या अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतील लोकांना मोठा फायदा होत आहे. यासाठी विद्यार्थांचे प्रयत्न व त्यांना प्राध्यापकांचे मिळालेले मार्गदर्शन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत,’ असे ए. जी. पाटील महाविद्यालयाच्या कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांनी सांगितले. ‘ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य व्ही .व्ही. पोतदार, श्री. विजापुरे यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. विजापुरे - ९९२२३ ७०११३
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
वर्षा About 159 Days ago
खूपचं छान आणि कौतुकास्पद आहे. असचं प्रगती करत राहा.
1
0
श्रीराम कुलकर्णी About 159 Days ago
छान बातमी वाचायला मिळाली .
0
0

Select Language
Share Link