Next
स्पार्क मिंडाचा डाय कास्टिंग प्लांट
प्रेस रिलीज
Saturday, February 10, 2018 | 01:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : जागतिक स्तरावरील ऑटोमोटिव घटकांची उत्पादक असलेल्या, ‘स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रूप’तर्फे पुण्यातील चाकण येथे डाय कास्टिंगच्या सर्वोत्तम उत्पादक प्लांटचे उद्घाटन आठ फेब्रुवारी २०१८ रोजी करण्यात आले. अॅल्युमिनिअम ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग आणि लो प्रेशर डाय कास्टिंगसाठी दोन आणि चारचाकी उत्पादनांसाठी पुण्यात ही सुविधा तयार करण्यात आली आहे.

मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नव्या डाय कास्टिंग उत्पादन सुविधेसाठी प्राथमिक स्तरावर शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. कंपनी यापूर्वीपासून अॅल्युमिनिअम आणि झिंक डाय कास्टिंग मशिनसाठीचे घटक यासाठी खास प्रक्रिया राबवत आहे. ग्रेटर नोएडा आणि पुणे येथून ऑटोमोटिव बाजारासाठी टर्बोचार्जर सिस्टम, ब्रेकिंग यंत्रणा, हँडल माउंटिंग घटक आणि इंजिन माउंटिंग घटक यासाठी कंपनी सेवा पुरवते. पुण्यातील तिसऱ्या डाय कास्टिंग प्लांटच्या उद्घाटनामुळे भारतातील तसेच निर्यातीच्या मागण्या पुरेशा प्रमाणात पूर्ण करणे शक्य होणार आहे. ही नवी सुविधा, ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग आणि लो प्रेशर डाय कास्टिंगसाठीच्या सर्वोत्कृष्ट स्पर्धात्मक केंद्रासह सुसज्ज आहे.

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपचे ग्रुप सीईओ अशोक मिंडा म्हणाले, ‘स्पार्क मिंडा नेहमीच दर्जा आणि ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करते. आमची उत्पादने आणि तांत्रिक मागण्या यासाठी आम्ही नियमितपणे सर्वोत्तम सेवा देतो. आमच्या पुण्यातील नवीन प्लांटच्या स्थापनेमुळे ग्रुप आता डाय कास्टिंग घटकांच्या भारतातील आणि जागतिक स्तरावरील ऑटोमोटिव ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकणार आहे.
दृष्टीकोन आणि मिशन यासह भौगोलिक सीमारेषांच्या पलिकडे विस्तार करून, सर्वात चांगल्या प्रकारे आमच्या जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे.’

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपचे ग्रुप चीफ मार्केटिंग अधिकारी एन. के. तानेजा म्हणाले, ‘ऑटोमोटिव उद्योगक्षेत्र सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वाढते आहे, याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठांतून मागण्याही वाढत आहेत. स्पार्क मिंडा ग्रॅव्हिटी डाय कास्टिंगमधील जोमदार प्लेयर आहे, आणि नव्या प्लांटद्वारे हा वारसा पुढे चालवतानाच नव्या उत्पादनांचा विकास आणि एकीकरणही करण्यात येईल, यासह पुण्यातील चाकण येथे आमच्या नव्या तांत्रिक केंद्राचे (स्पार्क मिंडा टेक्निकल सेंटर - एसएमआयटी) उद्घाटन झाले आहे.’

मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सीईओ सुधीर कश्यप म्हणाले, ‘आम्ही लक्षणीयरित्या आमच्या तांत्रिक प्रक्रिया, उत्पादन विकासासाठी संलग्नित केल्या आहेत. सर्वोत्तम उत्पादने मिळवण्यासाठी आणि ती विकसित व उत्पादित करण्यासाठी, ही नवी सुविधा देण्यात आली आहे. पॉवर्ड बाय पॅशन या आमच्या मूलमंत्रासह आम्ही सेवा देतो आणि आमच्या क्षमता प्रत्येक वर्षागणिक वाढत्या असतील, याची आम्हाला खात्री आहे.’

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपची स्थापना १९५८मध्ये झाली.  आजच्या घडीला स्पार्क मिंडाच्या जगभरात ३५ उत्पादक सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांपासून कंपनीने जर्मनी आणि पोलंडमध्ये काही धोरणात्मक संपादने केली आहेत; तसेच इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान आणि झेक रिपब्लिक आदी देशांतील हरित क्षेत्रातील प्रकल्पांमध्येही संपादन केले आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link