Next
‘ध्यानधारणेच्या वाचनाचा आनंद घ्या’
ध्यानशिबिरात ब्रह्मर्षी सुभाष पत्रींचा सल्ला
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this story

आनापानसती या ध्यानाच्या प्रकाराची माहिती सांगताना ब्रह्मर्षी सुभाष पत्री.

पुणे : ‘स्वत:चा शोध घेण्यासाठी ध्यानधारणा करणार्‍या प्रत्येकानेच त्याला सर्व प्रकारच्या वाचनाची जोड द्यायला हवी. त्याचा आनंद मोठा असून, कुणाशीही बोलण्यापेक्षा मोठ्या लोकांचे साहित्य आपल्याला प्रगल्भ करते,’ असे प्रतिपादन पिरॅमिड ध्यानपचार फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मर्षी सुभाष पत्री यांनी केले.

पुण्यात पत्रकार संघात त्यांनी १५० पुणेकरांशी आनापानसती या ध्यानाच्या प्रकाराची माहिती सांगताना बासरीवादनातून ध्यानाचा अनुभव उपस्थितांना दिला. या वेळी हिमालयात वास्तव्यास असणारे वेदगिरीबाबा, डॉ. दीपक संघवी आणि राजेश खेले उपस्थित होते. ध्यानधारणेमुळे आपल्याला उपयोग झाल्याचे सुहास श्रृंगारपुरे, संदीप ओंकार, रमेश आगरवाल, साईनाथ राजे यांनी या वेळी सांगितले.

सर्व क्षेत्रांत काम करणार्‍यांनी ध्यानधारणा करायला हवी, असे सांगून पत्री म्हणाले की, ‘ध्यान करण्याने आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला मदत होते. वाचनाने आपण खलील जिब्रान ते शेक्सपियर, कालिदास आाणि आदिशंकराचार्यांसारखा मोठा विचार करू शकतो. ध्यानधारणेच्या जोडीला वाचन केल्याने आपली समज वाढीस लागते. प्रत्येक लेखक व त्याचे सहित्य यामागचे सत्य त्यामुळे समजावून घ्यायला मदत होते.’

बासरी वादनावर आधारित ध्यानात तल्लीन असणारे पुणेकर साधक

‘वाचनाच्या जोडीला सज्जनांची संगत हवी व त्यासाठी आयुष्यातला एकही क्षण वाया घालवता कामा नये. हत्या नको, अहिंसा हवी आणि दुसर्‍याच्या गोष्टीत हस्तक्षेपही करू नका. आपण आपल्या शरीराचे मालक नसून त्याचा सांभाळ करणारे आहोत. त्यादृष्टीने सर्वार्थाने प्रत्येकानेच आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता बाणवली, तर ही पृथ्वी अशा पुरुषोत्तमांनी संपन्न होईल,’ असे पत्री यांनी सांगितले.

‘ध्यान म्हणजेच शांती व सत्य असून, तेच औषधही आहे. ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानाप्रमाणे ज्याला हवे ते त्याला मिळू शकेल. ध्यानाने मनाची धारणा बदलते आणि शरीर निरोगी बनते. त्याअर्थाने भविष्यात औषध कुणीही घ्यायला नको व बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी रुग्णालयांची गरजही भासता कामा नये. त्या अर्थाने ही पृथ्वी स्वर्ग बनायला हवी,’ असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link