Next
जन्माष्टमीला ७० बासरीवादकांचा स्वराविष्कार; रसिक मंत्रमुग्ध
सौरभ फ्ल्यूट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इस्कॉन मंदिरात सादरीकरण
BOI
Tuesday, August 27, 2019 | 05:07 PM
15 0 0
Share this article:

इस्कॉन मंदिरामध्ये सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या सौरभ वर्तक व त्यांच्या ७० शिष्यांनी सामूहिक बासरीवादन केले.

पुणे : ‘ओम जय जगदीश हरे’, ‘वैष्णव जन तो’, ‘रघुपती राघव राजाराम’, ‘हरे रामा हरे कृष्णा’ अशी मनाला भिडणारी भजने, राग  दुर्गा, राग भूपाळी आळविणाऱ्या बासरीच्या सुरांनी भारलेल्या वातावरणाचा अनुभव रसिकांनी घेतला. निमित्त होते कृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिरात झालेल्या सामूहिक बासरीवादनाचे. पुण्यातील सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० विद्यार्थ्यांनी येथे आपली कला सादर केली. 

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सौरभ फ्ल्यूट अकॅडमीचे सौरभ वर्तक व त्यांच्या ७० शिष्यांनी सामूहिक बासरीवादन केले. सामूहिक बासरीवादनात रोहित मुजुमदार यांनी तबल्यावर, तर कृष्णा साळुंखे यांनी पखवाजावर साथ केली. या वेळी चित्कला मुळ्ये, अदिती मुळ्ये, इस्कॉन मंदिरातील विश्वस्त श्वेतद्वीप दास व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रीधर कृष्ण दास उपस्थित होते.  


‘इस्कॉनतर्फे १६९ देशांमध्ये आणि ६३९ मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्त आयोजित केले जातात. पुण्यात नृत्य, संगीत अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आध्यात्मिक, तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते,’ असे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रीधर कृष्ण दास यांनी सांगितले.

या वेळी सौरभ वर्तक म्हणाले, ‘बासरी हे श्रीकृष्णाचे अतिशय प्रिय असे वाद्य आहे. कृष्ण जन्माच्या निमित्ताने सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० शिष्यांना घेऊन ही स्वरांची बरसात आम्हाला करता आली, याचा मला अतिशय आनंद झाला आहे.’

(सामूहिक बासरीवादनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search