Next
‘एटलास’तर्फे अत्याधुनिक ऑइल इंजेक्टेड स्क्रू कॉम्प्रेसर
प्रेस रिलीज
Tuesday, August 07, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : एटलास कॉप्कोच्या स्मार्ट एयर सोल्यूशन्स पोर्टफोलिओमध्ये एयर कॉम्प्रेसर जीए ९०+-१६० (व्हीएसडी) ऑइल- इंजेक्टेड स्क्रू कॉम्प्रेसर नव्याने समाविष्ट झाला आहे. हा कमीत कमी ऊर्जा वापर आणि बसवण्यास व देखभाल करण्यास सोपा या वैशिष्ट्यांसह बनवण्यात आला असून, यात अत्याधुनिक कॉम्प्रेशन घटक स्मार्ट इंजेक्शन तंत्रज्ञानासह बसवण्यात आले आहेत; तसेच अधिक कार्यक्षम अशा ऑइल- कूल्ड आयईफोर आणि आयईफाइव्हची जोड देण्यात आली आहे.

नव्या इलेक्ट्रॉनिकॉन टच कंट्रोलरमध्ये स्मार्ट अल्गोरिदम्स बसवण्यात आले आहे, ज्यामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो. हे उपकरण पाणी आणि एयर- कूल्ड आवृत्तीमध्ये निश्चित आणि बदलते स्पीड ड्राइव्ह, तसेच पर्यायी इंटिग्रेटेड ड्रायरसह उपलब्ध करण्यात आले आहे.

उत्पादन विपणन व्यवस्थापक जेम्स एल्ब्रो म्हणाले, ‘जीए कॉम्प्रेसर्सची आधुनिक श्रेणी खाणकाम उद्योग, धातू प्रक्रिया आणि उर्जा कारखान्यांसाठी, जिथे आयपी ६६ ड्राइव्ह ट्रेन वातावरणातील धूळ आणि आर्द्रतेपासून संपूर्ण संरक्षण पुरवते आणि तीव्र वातावरणीय परिस्थितीमध्येही विश्वासार्ह काम करू देते, त्यांच्यासाठी अधिक योग्य आहे. ही विश्वासार्हता सभोवतालचे वातावरण ५५ डिग्री सेल्सियस/१३१ फॅरेनहाइट असतानाही दीर्घ काळ आणि विना अडथळा टिकून राहाते.’

इलेक्ट्रोनिकॉन टचमुळे अधिक कार्यक्षम ड्राइव्ह ट्रेनद्वारे अधिकाधिक कार्यक्षमता, कमी अंतर्गत प्रेशर ड्रॉप्स आणि योग्य नियंत्रण शक्य होते. उपकरणाचे सर्व भाग सहजपणे देखभाल करता येण्याजोग्या सुट्या भागांनी बनवलेले आहेत, तर विस्तृत देखभालीची (सर्व्हिसिंग) गरज असल्यास सर्व सुटे भाग सोपेपणाने हाताळता येतील अशाप्रकारे पेटंट असलेल्या पोर्टलचे डिझाइन बनवण्यात आले आहे. यामुळे अशाप्रकारच्या इतर उपकरणांच्या तुलनेत देखभालीचा काळ निम्म्याने कमी होतो.

अटलास कॉप्को ग्राहकांना संपूर्ण मशिनवर पाच वर्षांचा वॉरंटी प्लस प्रोग्रॅम देते, ज्यामुळे तीव्र वातावरणातही त्याचे कामकाज सहजपणे सुरू ठेवता येते. नव्या ऑप्टिमायझर ४.० सेंट्रल कंट्रोलरने कंपनीच्या ईएस१६ सेंट्रल कंट्रोलरची जागा घेतली आहे. यामुळे कॉम्प्रेस्ड एयर सिस्टीमला कॉम्प्रेसर्स, ड्रायर्स, फिल्टर्स, एनर्जी रिकव्हरी सिस्टीम्स, जनरेटर्स, एयर रिसीव्हर्स, कूलर्स आणि बूस्टर्स अशा कार्यक्षम मशिन्समधून निवड करत जास्त कार्यक्षम बनवता येते. उच्च दर्जाच्या अंतर्ज्ञानी यूजर इंटरफेजमुळे ग्राहकाला मशिन तसेच संपूर्ण यंत्रणेची कामगिरी आणि ऊर्जेचा वापर तपासता येतो.

ग्राहकाला त्याच्या पीसीद्वारे लॅनमार्फत, स्काडा सिस्टीम किंवा स्मार्टलिंकद्वारे ऑप्टिमाझयर ४.० वर देखरेख करता येते. त्याचबरोबर ४.० इंडस्ट्री कम्पॅटिबल, इंटरनेट ऑफ थिंग्ज आमि एयर कॉम्प्रेस् सिस्टीमच्या डिजिटल इंटिग्रेशनचे इतर इंटेलिजंट नेटवर्क उपकरणांशी एकत्रीकरण करून त्याद्वारे उपकरणाची कामगिरी आणि संभाव्य देखभालीचा अंदाज सुधारता येतो; तसेच ऊर्जा कार्यक्षमता वाढवता येते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search