Next
भिडे कार्यशाळेत ‘पाणी वाचवा’ संदेश देत रंगोत्सव साजरा
BOI
Saturday, March 30, 2019 | 11:21 AM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेमध्ये दर वर्षी शिमगोत्सव आणि रंगोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षीही ‘पाणी वाचवा’ असा संदेश देत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या सहभागाने पालखी सजावट, ढोल-ताशाचा गजरात पालखीची मिरवणूक, पालखी नृत्य पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले. या वर्षी विद्यार्थ्यांनी शिमग्यात खेळे, संकासूर, गोमुचा नाच आणि नमन सादर करत फाकाही घातल्या. या माध्यमातून खेळ्यांची लोप पावणारी संस्कृती जपण्याचा संदेश दिला.रंगपंचमीच्या दिवशी कोरड्या रंगांची उधळत करत पाण्याची बचत करण्यात आली. या शिमगोत्सवाच्या निमित्ताने या विशेष मुलांमधील रंगांची भीती दूत करत कार्यक्रमांत सहभागी होऊन आनंद व्यक्त करणे, पर्यावरणपूरकता, पारंपरिकता जपणे आणि आत्मविश्वास वाढवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देश सफल झाल्याचे भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 146 Days ago
Can this not be carried in other schools ?
0
0

Select Language
Share Link
 
Search