Next
पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, November 23, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this article:



पुणे : पुणे रनिंग बियाँड मायसेल्फने (पीआरबीएम) अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या (एपीसीसीआय) सहकार्याने नुकतीच पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन (पीसीसीएम) घेण्यात आली. या मॅरेथॉनला १४ हजारांहून अधिक नोंदणीसह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.



यातील विजेत्यांचा गौरव अदर पूनावाला आणि मिलिंद सोमण यांच्या हस्ते करण्यात आला. मॅरेथॉनचे उद्घाटन सोमण आणि ‘एपीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर यांच्या हस्ते बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात पहाटे पाच वाजता करण्यात आले.



मॅरेथॉनच्या रूटला एम्सने प्रमाणित केले असून, महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशनने अधिस्वीकृती दिली आहे. या उपक्रमातून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यात आले आणि त्यातून सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला गेला; तसेच पुणे महानगरपालिका, स्वच्छ भारत सर्वेक्षण आणि पुणे स्मार्ट सिटी या प्रकल्पांनाही पाठिंब देण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search