Next
जपानी कंपन्यांसाठी महाराष्ट्र महत्त्वाची बाजारपेठ
‘आयजेबीसी’तर्फे ‘कोनींचीवा पुणे’चे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, November 20, 2018 | 12:34 PM
15 0 0
Share this article:पुणे : इंडो-जपान बिझनेस कौन्सिलतर्फे (आयजेबीसी) ‘कोनींचीवा पुणे’ या पहिल्या-वहिल्या उद्योग महोत्सवाचे आयोजन १७ व १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पुण्यात केले होते. भारत आणि जपानदरम्यान गुंतवणूक, व्यापार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीला चालना देणे हा या महोत्सवाचा उद्देश होता. अद्ययावत सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्था असलेले महाराष्ट्र राज्य हे देशभरात कार्यरत असलेल्या जापानी कंपन्यांसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ बनत असल्याचे या महोत्सवातून दिसून आले.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ‘आयजेबीसी’चे अध्यक्ष श्रीकांत अत्रे म्हणाले, ‘केवळ मुंबईच नव्हे, तर पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरसह येत्या दोन वर्षांत मोठी बाजारपेठ बनण्याच्या मार्गावर इतर शहरांवर लक्ष ठेवत जापानी उद्योग राज्यात येण्याचे प्रमाण वाढणार आहे. राज्याच्या मेक इन महाराष्ट्र उपक्रमामुळे अनेक जापानी कंपन्यांनी महाराष्ट्रात सुविधा, तसेच पर्यटन विकासासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २०१६-१७ वगळता, उभयपक्षी व्यापार क्षेत्रात होत असलेली एकंदरीत वार्षिक वाढ आठ ते दहा टक्क्या दरम्यान असली, तरी जापानी कंपन्यांबरोबरील भागीदारीमुळे ती उल्लेखनीयरित्या वाढण्याची शक्यता आहे.’

जपानच्या मुंबईतील दूतावासातील जपानचे काउंसल जनरल, र्योजी नोडा म्हणाले, ‘जपान आणि भारतादरम्यानचे आर्थिक संबंध दृढ करण्यामध्ये महाराष्ट्र महत्त्वाची आणि आघाडीची भूमिका निभावत आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा अतिवेगान रेल्वे प्रकल्प या दोन देशामधील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याद्वारे आमचे शिंकासेन तंञज्ञान वापरले जाईल. जपानचे अर्थ सहाय्य असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यास जपान बांधील आहे.’

हा अतिवेगवान रेल्वे प्रकल्प गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील आर्थिक राजधानी मुंबई या भारतातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे, असे सांगत नोडा म्हणाले, ‘पुण्यातील मुळा-मुठा नदीतील प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जपानने महाराष्ट्राच्या इतर क्षेत्रातील विकासात हातभार लावलेला आहे. भारतातील जापानी उद्योगांपैकी १० टक्के उद्योग महाराष्ट्रात, असून त्यांची मुख्यालये सुद्धा महाराष्ट्रात आहेत.’पुणे आणि जपान दरम्यान भावी उद्योगांना प्रोत्साहीत करण्यासाठी ‘आयजेबीसी’तर्फे पुण्यात आयोजित कार्यक्रमाचे कौतुक जेट्रो मुंबईचे महासंचालक ताकेशी होन्जो यांनी गेल्या दहा वर्षांत जपानी कंपन्या भारतातील विविध भागांमध्ये आपले अस्तित्व सातत्याने वाढवत असल्याचे नमूद केले. ‘भारताच्या उत्तर भागात जापानी कंपन्यांचे वाढते अस्तित्व पाहता, पुण्यासारख्या शहरांना प्रोत्साहित करणे गरजेचे होते. आम्हाला खात्री आहे, की या कार्यक्रमामुळे जपान आणि भारत या दोन्ही देशातील उद्योगांना चालना मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाकायामा प्रोफेक्चर गव्हर्मेंटच्या मुंबई कार्यालयाचे तात्सुनोरी योनीशी म्हणाले, ‘दिल्ली-मुंबई उद्योग कॉरिडॉर, तसेच बुलेट ट्रेन प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि चित्रपट उद्योगाचे माहेरघर असल्यामुळे जपानने या राज्याच्या संभाव्य वाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’

नेलीतो सिस्टीम्सचे अध्यक्ष अजय चड्ढा म्हणाले, ‘जपान आणि भारत या दोन देशातील मैत्रीसंबंधात वाढ करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र एक महत्त्वाची भूमिका निभावत असून, ही बाब दोन्ही देशासाठी फायद्याची आहे.’

‘आयजेबीसी’तर्फे आयोजित कोनींचीवा पुणे या दोन दिवसीय कार्यक्रमाबाबत बोलताना नोडा म्हणाले, ‘या कार्यक्रमामुळे जपान आणि भारत या दोन्ही देशांना एका छत्राखाली येण्यासाठी एक मंच उपलब्ध होतो आहे, जिथे भविष्यातील उद्योगाच्या संधी आणि संस्कृती, तसेच शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील संधींचा फायदा उठवता येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search