Next
‘भाजप प्रमुख पक्ष होण्यात महाजनांचा सिंहाचा वाटा’
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 05:22 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘भारतीय जनता पार्टी देशातील प्रमुख पक्ष होऊन यशाच्या या टप्प्यापर्यंत येण्यात स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा असून समाजासाठी हा पक्ष आणखी पुढे नेण्याचा संकल्प करू,’ असे प्रतिपादन खासदार किरीट सोमय्या यांनी तीन मे रोजी केले.

महाजन यांना बाराव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, मुख्यालय प्रभारी प्रताप आशर, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व निवृत्त पोलीस अधिकारी वाय. सी. पवार उपस्थित होते.

खासदार सोमय्या म्हणाले की, ‘१९८४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन जागा मिळाल्यानंतर प्रमोद महाजन यांनी दूरदर्शीपणे विविध राज्यात भाजपची वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी युती केली. त्यातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उदय झाला. परिणामी राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला पर्याय निर्माण झाला. भाजपच्या इथपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे.’

‘प्रमोद महाजन देशाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन जगभर भारतीय आयटी कंपन्यांना स्थान मिळवून दिले. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी क्षेत्रात भारताचा दबदबा आहे व या उद्योगाच्या माध्यमातून भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते याचेही श्रेय मुख्यतः प्रमोद महाजन यांनाच आहे,’ असे त्यांनी मनोगतात नमूद केले.

‘प्रमोद महाजन यांनी भाजपच्या उभारणीसाठी सर्वस्व दिले. ते अत्यंत मेहनती होते. पक्ष शिस्तीचा आग्रह धरतानाच ते सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहायचे,’ असे ही सोमय्या यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश पदाधिकारी संतोष आव्हाड यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link