Next
आता सिंचनाचे नियंत्रण करा स्मार्टफोनद्वारे
‘नेटाफिम’च्या ‘नेटबीट’द्वारे भारतीय शेतकऱ्यांचे सिंचनाचे काम होणार सोपे
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 01:10 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘नेटाफिम’ या इस्रायलच्या कंपनीने ‘नेटबीट’ हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून, नुकतेच हे तंत्रज्ञान भारतात सादर करण्यात आले. शेतजमीन आणि बाहेरील पिके, माती, हवामानाची स्थिती यांच्याशी संबंधित डाटावर सद्यस्थितीला अनुकूल शिफारशी देण्याचे काम या तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेली ही कल्पक अशी पहिलीच सिंचनप्रणाली असून, शेतकऱ्यांना स्मार्टफोनद्वारेही शेतातील सिंचनाचे नियंत्रण करता येणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीकडे लक्ष देणे, तपासणी करणे आणि कुठेही असले, तरी स्मार्टफोनच्या साह्याने हे तंत्रज्ञान वापरणे सहज शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने सिंचनाचे काम सोपे होण्यासाठी बनवण्यात आले आहे. ‘नेटाफीम’ने ५० वर्षांपूर्वी ठिबक सिंचन प्रणालीची सुरुवात करून कृषी क्षेत्रात नवीन क्रांती केली होती. याच प्रकारे आता ‘नेटबीट’ ही डिजिटल सिंचन प्रणाली विकसित करून पुन्हा एकदा क्रांती करत आहे. ‘नेटबीट’च्या भारतातील सादरीकरणावेळी ‘नेटाफिम’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान, इस्रायलचे संचालक लीयर डोरोन, व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख इझर गिलाड उपस्थित होते.

कृषीशास्त्र आणि जलविद्युतशास्त्र या विषयात ‘नेटाफिम’ला विशेष अनुभव असून, कंपनी मागील ५० वर्षांपासून या विषयात संशोधन करत आहे. हे तंत्रज्ञान इस्त्राइल टेक्नोलॉजीवर आधारित असून, याची निर्मिती ‘एमप्रेस्ट’ या कंपनीच्या सहकार्याने केली आहे. ‘नेटबीट’मुळे शेतकऱ्याला विविध पिकांच्या नमुन्यांचा ‘रियल टाइम डाटा’ मिळू शकतो, त्यामुळे पाण्याचा आणि इतर स्रोतांचा कमीत कमी वापर करून ‘नेटबीट’ ही सिंचन प्रणाली शेतकऱ्याला स्वत:ला वापरता येणार आहे. सर्व स्तरातील शेतकऱ्यांना समोर ठेवून, ही प्रणाली त्यांना वापरण्यासाठी सोपी व्हावी व जास्तीत जास्त फायदे मिळावे यादृष्टीने तयार केली आहे.

याविषयी बोलताना चौहान म्हणाले, ‘नेटाफिम ही कंपनी असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी स्रोतांचा वापर करून जास्त उत्पादन घेण्यासाठी जगभरात मदत करते. ‘नेटबीट’द्वारे लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना डिजिटल सिंचन आणि कमीत कमी स्रोतांमध्ये जास्त उत्पन्न देण्यासाठी टिकाऊ आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे.’

डोरोन म्हणाले, ‘नेटबीट ही स्वतःची बुद्धी असणारी पहिली सिंचन व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये सिंचन, खतपाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि इतर व्यवस्था हे  ‘Smart Dss crop model’सोबत सगळे एकत्रितपणे शक्य होते. कोणत्याही वेळेला आणि कुठलाही हवामान अंदाज, इतर सुविधा आणि शेतीचा दूरवरच्या ढगांशी असणारा संबंध यामुळे समजतो.’

सध्या अन्न व पाण्याची सुरक्षेची आव्हाने पाहता मौल्यवान संसाधनांची कमतरता, पाण्याचा अकार्यक्षम वापर यामध्ये ‘नेटफिम’च्या ‘नेटबीट’ या पहिल्याच स्वतःची बुद्धी असलेल्या प्रणालीचा आम्हाला अभिमान असल्याचे गिलाड म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link