Next
अब्दुललाट येथे रविवारी ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन
BOI
Saturday, February 23, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this story

अब्दुललाट  : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावात रविवारी, २४ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्रामसंस्कृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विधायक ८९’ आणि ‘चांगुलपणाची चळवळ’ या संस्थांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

संमेलनाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख भूषविणार असून, संमेलनाचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. निवृत्त परराष्ट्र सचिव आणि अब्दुललाटचे सुपुत्र डॉ. ज्ञानेश्वर मुळे सत्कारमूर्ती आहेत.

गावातील तलावाच्या परिसरात कै. अप्पासो सिदगोंडा पाटील साहित्यनगरी साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी, जलदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे.

दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात खासदार राजू शेट्टी, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पुण्याच्या सहायक पोलीस उपायुक्त वैशाली जाधव, वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ आणि कोल्हापुरातील हॉटेल उद्योजिका कविता कडेकर यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर कवीसंमेलन रंगणार असून, संमेलनाचा समारोप स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. ‘लागिरं झालं जी ..’ मालिकेतील रावल्याची भूमिका साकारणारा अभिनेता या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
L.k. About 24 Days ago
Uttam
0
0
Dr. Dhananjay Manohar Madhabhave About 24 Days ago
Latetil Vidhaayak kaaryaachi Laat sampurn Bhaarataat pasarali... Aamche Bhaagy ch ki Ya Kaaryaat sahabhaagi vhaayache.... Ashich Pragati pudhe hi hot rahaanaar...
0
0

Select Language
Share Link