Next
‘ओपन टॅप’च्या सेवेला महाराष्ट्रात सुरुवात
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 12:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : चेन्नई येथे स्थिर अल्टरनेट फायनान्स (अल्टफिन) ग्रोथ स्टेजचा स्टार्ट अप असलेल्या ‘ओपन टॅप’ने पुणे येथे सुरू होत असलेल्या सेवा सुविधांबद्दल जाहीर केले. पुणे हे आरओएमसाठी (रेस्ट ऑफ महाराष्ट्र) प्रादेशिक कार्यालय असेल आणि नाशिक, चाकण, अहमदनगर आणि पीसीएमसी येथे शाखा कार्यालये असतील. ही कार्यालये येत्या तीन महिन्यांत सुरू होतील.

कंपनीचे उद्दिष्ट हे ‘आरओएम’ भागामध्ये भारतीय चलनानुसार २५ कोटींची रक्कम कर्ज म्हणून देण्याचे असून, २०१८ अखेरपर्यंत दहा हजार कर्जांच्या स्वरूपात आपला व्यावसाय वाढविण्याचा आहे. ‘ओपन टॅप’ या भागातील ५० लाख लोकांना लक्ष्य करणार असून, या विभागासाठी या वर्षा अखेरपर्यंत ३० कर्मचारी कार्यरत करून घेण्याचा त्यांना मानस आहे. आपला विस्तार वाढवताना ‘ओपन टॅप’ सध्या बेंग्लोर, चेन्नई (मुख्यालय), कोइंबतूर, गोबीचेट्टीपलायम, नाशिक, पाँडेचेरी, पुणे, सालेम, त्रिरूपुर आणि त्रिची येथे स्थित आहे.

या वेळी ‘ओपन टॅप’चे सह-संस्थापक आणि सीईओ सेन्थिल नटराजन म्हणाले, ‘आपल्या देशामध्ये पर्यायी कर्ज देण्याच्या भरपूर संधी असून, यामुळे भारतातील कर्ज देऊ करण्याच्या सेवांना एक नवीन मार्ग मोकळा होणार आहे. ‘आरओएम’ भागातील एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा सर्वसाधारण पगार हा भारतीय चलनानुसार १० ते १२ हजार असतो. यातील ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ते आपल्या कुटुंबियांना पाठवतात. शिल्लक राहिलेला पगार हा भाडे, खाणे आणि प्रवासासाठी किंवा इतर आवश्यक बाबींसाठी खर्च केला जातो. यामुळे आप्तकालीन परिस्थितीत किंवा भविष्यातील खर्च जसे मुलांच्या शिक्षणासाठी काहीही शिल्लक राहात नाही.’

‘ओपन टॅप या भागांमधील ही आर्थिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यासाठी आमच्याद्वारे लघु काळासाठी वैयक्तिक कर्ज आम्ही देणार आहोत आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करत आयुष्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ असे नटराजन यांनी सांगितले.

‘ओपन टॅप’ची सुरुवात ही २०१५ साली गुंतवणूक बॅंकर्सच्या त्रिकुटाद्वारे करण्यात आली. ‘अल्टफिन’ स्टार्ट-अपचे सध्याचे ध्येय हे लघु काळासाठी कर्ज देण्याचे असून, यामधील त्यांचा प्रमुख ग्राहक हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय नोकरदार असेल, ज्याची मासिक मिळकत ही भारतीय चलनानुसार २५ हजारांपेक्षा कमी असेल. स्टार्ट अपचा हेतू हा भारतीय चलनानुसार १०० कोटींपर्यंत पोहोचून २०१८च्या अखेरपर्यंत ४० हजार नवीन ग्राहक आपल्यात सामावून घेण्याचा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link