Next
डॉ. अशोक रानडे
BOI
Saturday, November 25 | 04:00 AM
15 0 0
Share this story

दिल्लीच्या चांदणी चौकाजवळच्या गरीबा कलान गल्लीत मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अत्तरांच्या १०-१० ग्रॅमच्या कुप्या मागवून, त्या अत्तरांचे वेगळ्या ऋतूत शरीरावर आणि विशेषतः गायकीवर होणारे परिणाम अभ्यासणाऱ्या डॉ. अशोक रानडे या ख्यातनाम संगीततज्ज्ञाचा २५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
....................
२५ नोव्हेंबर १९३७ रोजी पुण्यात जन्मलेले अशोक रानडे म्हणजे संगीत क्षेत्रातलं अत्यंत व्युत्पन्न व्यक्तिमत्त्व! त्यांचा भारतातल्या विविध संस्कृतींमधल्या शास्त्रीय संगीताचा आणि घराण्यांचा गाढा अभ्यास होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे ते संस्थापक होते. 

१९८४ ते १९९३ या काळात त्यांनी मुंबईच्या ‘एनसीपीए’चे डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं. त्यांनी स्वतः ‘रसिकरंग’ या टोपणनावानं अनेकविध रागांत आणि तालांत वेगवेगळ्या बंदिशी बांधल्या होत्या. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी ५०हून अधिक वर्षं संगीत क्षेत्रात संगीतासाठी काम केलं. भारतीय संगीताचं आदिम संगीत, लोकसंगीत, धार्मिक संगीत, लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत असं वर्गीकरण करून त्यामागची शक्तिस्थानं शोधण्याचा प्रयत्नी त्यांनी सातत्यानं केला. 

परंपरा आणि आविष्कार, भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ, भाषण व नाट्यविषयक विचार, मला भावलेले संगीतकार, लोकसंगीतशास्त्र, संगीत विचार आणि हिंदुस्तानी संगीत, संगीताचे सौदर्यशास्त्र, स्ट्राव्हिन्स्कीचे सांगीतिक सौदर्यशास्त्र, हिंदी चित्रपट गीते, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

३० जुलै २०११ रोजी त्यांचं निधन झालं. 

(अशोक रानडे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link