Next
इंदापूर नॅशनल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, June 06, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this article:

इंदापूर : ‘ग्रीन वूड क्रिएशनतर्फे नवोदित छायाचित्रकार (फोटोग्राफर) आणि हौशी छायाचित्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून येत्या जुलै महिन्यात केशर टॉकीज इंदापूर येथे पहिल्यांदा नॅशनल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतील फोटोग्राफरांनी सहभाग नोंदवला आहे,’ अशी माहिती फेस्टिवलचे दिग्दर्शक व आयोजक सोमनाथ जगताप यांनी दिली.

‘यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विविध गटांतून २५ हजार रुपयांची पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धाच्या माध्यमातून शहरी फोटोग्राफर प्रमाणे ग्रामीण भागांतील फोटोग्राफरांनी काढलेले सुंदर फोटो आपल्याला पहायला मिळतील आणि यातूनच आपल्याला नवीन उत्तम फोटोग्राफर मिळतील. त्यासाठीच आम्ही यावर्षी इंदापूर नॅशनल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर शहराचे नाव स्पर्धाच्या माध्यमातून सर्व कला क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ३० जूनपर्यंत नियमित वेळेमधील प्रवेशिका स्वीकारल्या जाणार असून, उशिरा येणाऱ्या प्रवेशिका १५ जुलैपर्यंत स्वीकारल्या जातील,’ असे जगताप यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी : www.greenwoodcreation.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search