Next
पुण्यातील युनियन बोर्डिंगच्या जीर्णोद्धाराचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, October 03, 2018 | 02:16 PM
15 0 0
Share this article:

युनियन बोर्डिंगच्या जीर्णोद्धार कामाचे उद्घाटन करताना बोर्डिंगमध्ये राहणारी मुले.

औंध : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील युनियन बोर्डिंगच्या जीर्णोद्धार कामाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राम कांडगे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांडगे यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. य संस्थेला रयत हे नाव देण्यामागची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन महत्त्वाचे उल्लेख आहेत. एक रयतेचा राजा आणि दुसरा कुळवाडी भूषण (शेतकऱ्यांचा राजा) त्यामुळे कर्मवीर अण्णांनी संस्थेला रयत शिक्षण संस्था हे नाव दिले आहे.’

युनियन बोर्डिंगच्या स्थापनेचा इतिहास सांगताना कांडगे म्हणाले, ‘पुण्यामध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे करारानंतर अण्णांनी पुण्यातील पांडवनगर येथे सन १९३२ मध्ये युनियन बोर्डची स्थापना केली. खेड्या-पाड्यातील, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, तसेच शहरात राहता यावे, अशा हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुण्यातील पांडवनगर या ठिकाणी युनियन बोर्डिंगची स्थापना केली. त्या वेळी अण्णा दर रविवारी सातारवरून आप्पा बळवंत चौकापर्यंत बसने येत आणि तेथून हॉस्टेलपर्यंत पायी चालत येताना  डोक्यावर रानमेवा (ऊस, हरबरा, मुळा, गाजर इतर पदार्थ ) घेऊन येत असत. तेव्हा हॉस्टेलमधील विविध जाती जमातीची मुले सकाळी अंगण शेणाने सारवून अण्णांची आतुरतेने वाट पहात असत. युनियन बोर्डिंगच्या स्थापनेमुळे गोरगरिबांची अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आणि खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती झाली.’

‘महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थाने अण्णांनी चालविला. स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा,’ असे आवाहन कांडगे यांनी केले.

‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चार ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून, महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक नवी क्रांती घडवली. चार ऑक्टोबर २०१९ रोजी संस्थेच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संस्थांतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे. चार ऑक्टोबर २०१८पासून या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने विविध उपक्रम आयोजित केले आहेत,’ अशी माहिती प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी या प्रसंगी  दिली.‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या छायेत अनेक वंचित मुले-मुली शिक्षण घेत आहेत. अनेक मुले-मुली युनियन बोर्डिंगमधे राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर आण्णांनी सुरू केलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करून स्वावलंबी शिक्षण घेत आहेत. कर्मवीरांनी लावलेला शिक्षणाचा वटवृक्ष आज गगनाला भिडला आहे’ असे डॉ. बोबडे म्हणाल्या.

युनियन बोर्डिंगच्या जीर्णोद्धाराचे उद्घाटन बोर्डिंगमध्ये राहणाऱ्या मुलांनीच केले. या प्रसंगी पिंपरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आणि मंचर कॉलेजचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, विभागीय अधिकारी श्री. रत्नपारखी, श्री. पवार, कन्या शाळेच्या प्राचार्या श्रीमती पवार, हुतात्मा राजगुरू कॉलेजचे प्राचार्य श्री. शिंदे, डॉ. अतुल चौरे यांसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search